घरदेश-विदेशKangana Ranaut : मी गोमांस आणि लाल मांस खात नाही, कंगनाचे वडेट्टीवारांना...

Kangana Ranaut : मी गोमांस आणि लाल मांस खात नाही, कंगनाचे वडेट्टीवारांना प्रत्युत्तर

Subscribe

मी गोमांस आणि लाल मांस खात नाही, अशी सोशल मीडियावर पोस्ट करत अभिनेत्री कंगना रणौतने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याना प्रत्युत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री तसेच हिमाचल प्रदेशातील भाजपा उमेदवार कंगना रणौत आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात शब्दरण रंगले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या दाव्याला कंगना रणौतने सोशल मीडियावरून उत्तर दिले आहे. मी गोमांस आणि लाल मांस खात नाही, असे तिने स्पष्ट केले आहे. (Lok Sabha Election 2024: Kangana’s response to Vijay Wadettiwar’s allegation)

कंगना राणौतने अलीकडेच ती गोमांस खात असल्याचे म्हटले होते, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मला बीफ आवडते आणि मी खाते, असे सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कंगना रणौतला भाजपाने तिकीट दिले आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. आपल्या ट्विटर हॅण्डलवरून कंगनाने याला प्रत्युत्तर दिले आहे. मी बीफ किंवा कोणत्याही प्रकारचे रेड मीट खात नाही. माझ्याबद्दल पूर्णपणे निराधार अफवा पसरवल्या जात आहेत, हे लज्जास्पद आहे. मी अनेक दशकांपासून योगिक आणि आयुर्वेदिक जीवनशैलीचा प्रचार करत आहे, असा प्रतिदावा तिने केला आहे.

- Advertisement -

माझी प्रतिमा डागाळण्यासाठी अशी रणनीती उपयोगी ठरणार नाही. कारण लोकांना माहीत आहे की, मी एक अभिमानी हिंदू आहे आणि अशा प्रकारची कोणतीही गोष्ट त्यांची दिशाभूल करू शकत नाही. जय श्री राम, असे कंगनाने म्हटले आहे. विशेष म्हणजे, तिच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना काही नेटिझन्सने 24 मे 2019 रोजीच्या यासंदर्भातील ट्वीटची इमेज दिली असून कंगनाच्या ट्विटर हॅण्डलवरून ही पोस्ट हटविण्यात आली आहे, हे उल्लेखनीय.

- Advertisement -

कंगना राणौतबद्दल दररोज आक्षेपार्ह कमेंट किंवा दावे केले जात आहेत. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी अलीकडेच त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर कंगना आणि तिचा मतदारसंघ मंडी यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. मात्र, नंतर श्रीनेत यांनी आपण ही पोस्ट केली नव्हती, अशी सारवासारव केली होती.

हेही वाचा – Lok Sabha : महाविकास आघाडीत नाही तर महायुतीत बिघाडी; संजय राऊत स्पष्टच बोलले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -