घरताज्या घडामोडीUddhav Thackeray : अहो तुम्ही मोदीभक्त, नमोभक्त झालेला आहात, आम्ही...; उद्धव ठाकरेंचं...

Uddhav Thackeray : अहो तुम्ही मोदीभक्त, नमोभक्त झालेला आहात, आम्ही…; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना उत्तर

Subscribe

अहो मिंधे तुम्ही मोदीभक्त, नमोभक्त झालेला आहात. आम्ही मोदीभक्त नाही आम्ही देशभक्त आहोत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत.

अहो मिंधे तुम्ही मोदीभक्त, नमोभक्त झालेला आहात. आम्ही मोदीभक्त नाही आम्ही देशभक्त आहोत, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे सध्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. जनसंवादाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. तसेच, ठिकठिकणी सभा घेत राज्यातील महायुतीच्या सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. (Uddhav Thackeray Gave Answer To CM Eknath Shinde Over His Comment On Hindu)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशभरात निघालेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या शिवतीर्थावरील इंडिया आघाडीच्या सभेने झाला. या सभेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. भाषणाच्या सुरुवातील उद्धव ठाकरेंनी ‘माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..’, असं म्हटलं. त्यावरून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपासून ‘तमाम हिंदू बांधवांनो’ हा शब्द रद्द झाला म्हणत उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री शिंदेंच्या या टीकेनंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“आम्ही देशभक्त आहोत. १७ तारखेच्या सभेत इंडिया आघाडीचे नेते आले होते. अथांग जनसागर होता. मी नेहमी सुरुवात करतो जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो, हे काही मी सोडलेलं नाही. मोदींनी तर इंडिया आघाडीला इंडियन मुजाहिदीनचं नाव त्यांनी दिलं होतं. त्यामुळे मी म्हटलं होतं जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो..” मी यात काय चुकीचं बोललो? पण मी हे बोलल्यानंतर शिंदे दाढी खाजवत तिकडे गेले ते बोलले की, काँग्रेस बरोबर हे गेले यांची भाषाच बदलली. अहो शिंदे तुम्ही मोदीभक्त, नमोभक्त झालेला आहात. आम्ही मोदीभक्त नाही आम्ही देशभक्त आहोत”, असे म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिले.

याशिवाय, “नरेंद्र मोदींची पालखी वाहण्यासाठी माझ्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली नाही. जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली. तुम्ही फक्त पालखीचे भोयी व्हा. मला मोदी भक्तांना हा सवाल आहे की जो मोदीभक्त आहे तो देशभक्त नाही का? जर देशभक्त असाल तर पोटात कशाला दुखतं आहे? भाडोत्री जनता पक्षाला जर असं वाटत असेल की देशापेक्षा मोदी मोठे आहेत तर ते चालणार नाही, आम्ही ते खपवून घेणार नाही”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो हे शब्द रविवारपासून बंद झाले. हिंदू बांधवांनो-भगिनींनो म्हणायला जीभ कचरली का? त्यांनी हे म्हणणे टाळले त्यावरुन पुन्हा लक्षात आले की, बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका, त्यांची विचारसरणी हे सगळे त्यांनी सोडले. त्यामुळे आम्हाला त्यांना सोडावे लागले आणि मोठा निर्णय घेत बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा निर्णय घ्यावा लागला. यांना जनतेने दोन वर्षांपूर्वीच तडीपार केले आहे. हे आम्हाला काय तडीपार करणार?” अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.


हेही वाचा – IAS TRANSFER : अभिजित बांगर, सैनी मुंबई महापालिकेत, तर अश्विनी भिडे, पी. वेलरासू यांची बदली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -