Monday, September 25, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Religious Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या आगमनाला 8 दिवस बाकी; वाचा शुभ मुहूर्त...

Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या आगमनाला 8 दिवस बाकी; वाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

Subscribe

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे.

गणेश चतुर्थी तिथी

चतुर्थी तिथी प्रारंभ : 18 सप्टेंबर 2023 दुपारी 12:39 पासून
चतुर्थी तिथी समाप्त : 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01:43 पर्यंत असेल. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. पूजेचा शुभ मुहूर्त = सकाळी 11:19 ते दुपारी 01:43 असेल.

गणेश चतुर्थी पूजा विधी

- Advertisement -

Ganesh Chaturthi 2022: Dos and don'ts to follow while performing puja -  Hindustan Times

 

- Advertisement -

या दिवशी ब्रम्ह मुहूर्तावर उठून स्नान करावे. संपूर्ण घरात गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर गणेशाचे नामस्मरण करत पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडावर श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करावी. गणेशाच्या मुर्तीला फुलाने पाणी अर्पण करा. त्यानंतर गणेशाला लाल रंगाचे फूल, सुपारी, लवंग, वेलची, आंब्याचे पान, खाऊचे पान अर्पण करावे. देवासमोर धूप, दीप लावावा. गणेशाची आरती करावी. त्यानंतर गणेशाला नारळ आणि उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवावा. तसेच गणेशाच्या मुर्तीजवळ दक्षिणा आणि 21 लाडू ठेवावे.

 


हेही वाचा :

उद्या श्रावणातील दुसरे प्रदोष व्रत; अशी करा महादेवाची पूजा

- Advertisment -

Manini