Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Religious Ganesh Chaturthi 2023 : कशी असावी बाप्पाची मूर्ती?

Ganesh Chaturthi 2023 : कशी असावी बाप्पाची मूर्ती?

Subscribe

हिंदू धर्मात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी देशभरात प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये गणेश मूर्तींची स्थापना केली जाते. संपूर्ण राज्यभरात 10 दिवस गणेशोत्सवाचा जल्लोष असतो. प्रत्येक ठिकाणी गणपतीची पूजा-आराधना केली जाते. सगळीकडे उत्साह आणि चैतन्याचं वातावरण असतं. या वर्षी 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. बाप्पाच्या आगमनाला आता जवळपास काहीच दिवस उरले आहेत. यासाठी बाप्पाची मूर्ती कशी खरेदी करावी हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कशी असावी बाप्पाची मूर्ती?

Ganesh Chaturthi 2022: Ganpati Decoration Ideas 2022 That You Can Try,  Check Out the Easy and Simple DIY Decorations Here

  • वास्तू शास्त्रानुसार, बाप्पाची मूर्ती खरेदी करताना नेहमी काही गोष्टींचे पालन करणं आवश्यक मानले जाते. यामध्ये सर्वात आधी बाप्पाची सोंड कोणत्या दिशेला आहे हे पाहावे. डाव्या बाजूला सोंड असेल अश्या मूर्तीची निवड करावी.
  • घरामध्ये गणपती नेहमी बसलेल्या स्थितीत असावा. वास्तूशास्त्रानुसार हे शुभ मानले जाते. बाप्पाच्या मूर्तीसोबतच उंदीर देखील असावा. उंदराशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते.

गणेश चतुर्थी तिथी

- Advertisement -

चतुर्थी तिथी प्रारंभ : 18 सप्टेंबर 2023 दुपारी 12:39 पासून
चतुर्थी तिथी समाप्त : 19 सप्टेंबर 2023 दुपारी 01:43 पर्यंत असेल. 19 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल.

पूजेचा शुभ मुहूर्त = सकाळी 11:19 ते दुपारी 01:43 असेल.

- Advertisement -

 


हेही वाचा : Ganesh Chaturthi 2023 : बाप्पाच्या आगमनाला 8 दिवस बाकी; वाचा शुभ मुहूर्त आणि तिथी

- Advertisment -

Manini