Monday, April 29, 2024
घरमानिनीReligiousMahashivratri 2024 : महाशिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण करा महादेवाच्या 'या' प्रिय वस्तू

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण करा महादेवाच्या ‘या’ प्रिय वस्तू

Subscribe

हिंदू धर्मात महाशिवरात्रीला खूप महत्वपूर्ण मानले जाते. यंदा शुक्रवार, 8 मार्च रोजी महाशिवरात्री साजरी केली जाईल. या दिवशी महादेवाची पूजा-आराधना तसेच व्रत केल्याने इच्छित वराची प्राप्ती होते. तसेच अनेक भाविक या दिवशी शिवमंदिरात जातात. महादेवांच्या आराधनेसोबतच दान-धर्म करणं देखील शुभ मानलं जात. त्यामुळे या दिवशी महादेवाला प्रिय वस्तू अवश्य अर्पण कराव्या.

शास्त्रानुसार, महादेवांना पांढऱ्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत. ज्योतिष शास्त्रात दूध, दही, साखर, तांदूळ या पांढऱ्या वस्तूंना चंद्राशी संबंधित मानले जाते. चंद्र ग्रह महादेवांच्या मस्तकावर विराजमान आहे. त्यामुळे तो महादेवांना अत्यंत प्रिय आहे. सोमवार श्रावण महिना तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी चंद्राशी संबंधित या पांढर्‍या वस्तूंचा शिवलिंगावर अभिषेक केल्यास महादेव प्रसन्न होऊन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

- Advertisement -

Legend of Shiva Linga

 

- Advertisement -
  • दूध

महाशिवरात्रीला कच्च्या दुधाने शिवपिंडीवर अभिषेक केल्याने घरातील कलह दूर होतात. कुटुंबात शांतता नांदते. मानसिक तणाव दूर होतो.

  • दही

महाशिवरात्रीला शिवपिंडीवर दह्याचे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात. अपूर्ण कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख समृद्धी येईल.

  • साखर

महाशिवरात्रीला शिवपिंडीवर साखर अर्पण केल्याने बुद्धी, एकाग्रता वाढते. तसेच यामुळे आयुष्यात गोडवा निर्माण होतो.

  • तांदूळ

महाशिवरात्रीला अखंड तांदूळ अर्पण केल्याने आर्थिक परिस्थिती सुधारते. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहिल.

 


हेही वाचा : 

Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीच्या दिवशी करा महादेवांच्या ‘या’ 5 प्रभावी मंत्राचा जप

- Advertisment -

Manini