घरमहाराष्ट्रPolitics : "अबकी बार...", महाराष्ट्रात 'महायुती 48 विरुद्ध शून्य'; शिवसेनेच्या 'या' नेत्याचा दावा

Politics : “अबकी बार…”, महाराष्ट्रात ‘महायुती 48 विरुद्ध शून्य’; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा दावा

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तारखांची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी कंबर कसली असून जागावाटपासंदर्भात बैठका घेत आहेत. अशातच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीच्या सर्वच जागांवर उमेदवार निवडून येतील, असा विश्वास शिवेसना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत व्यक्त केला आहे. ते धाराशिव येथील परंडा याठिकाणी बोलत होते.

हेही वाचा – Devendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र पुन्हा प्रथम क्रमांकावर – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे गुरुवारी (29 फेब्रुवारी) भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, निवडणुकीच्या वेगवेगळ्या सर्व्हेक्षणामध्ये 42, 45, 40 अशा काही लोकसभेच्या जागा महायुतीला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. पण यात काही तथ्य नाही. यवतमाळ येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘अबकी बार, चारसो पार’चा नारा दिला आहे. त्यामुळे मी हेच म्हणेन की, ‘महायुती 48 विरुद्ध शून्य’ हेच चित्र महाराष्ट्रातून देशाला पाहायला मिळेल, असा विश्वास तानाजी सावंत यांनी व्यक्त केला आहे.

केंद्र सरकार सोबत असल्यावर विकास कसा होतो, हे जनतेने पाहिले आहे. केंद्राच्या मदतीशिवाय विकास होणे अशक्य आहे, असा दावा करताना तानाजी सावंत म्हणाले की, ज्या ठिकाणी विकासासाठी हजारो कोटींचा निधी लागतो, त्या ठिकाणी केंद्र सरकार अगदी हिमालयाप्रमाणे आपल्या पाठीशी उभा राहतो. त्यामुळे विरोधाला विरोध किंवा विकासाला विरोध ही सर्वसामान्य जनता खपवून घेणार नाही. गेल्या 40 ते 50 वर्षापासून ज्यांनी महाराष्ट्र आणि देश मातीत घालण्याचे ध्येय ठेवले होते, त्यांना भारतातील 140 कोटी जनतेने झुगारून टाकलेले आहे, असे वक्तव्य करत तानाजी सावंत यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Budget Session : अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधकांचे आंदोलन, सरकारविरोधात घोषणाबाजी

जनतेने मोदींना विकास पुरुष, विश्वनेता बनवले

जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना विकास पुरुष, विश्वनेता बनवले आहे आणि हे नेतृत्व भारतातील जनता कधीही सोडणार नाही. असे वक्तव्य करत तानाजी सावंत यांनी उपस्थितांना आवाहन केले की, मागील सात पिढ्याला लागलेलं दारिद्र्य घालवण्यासाठी नरेंद्र मोदी यांना मतदान करायचे आहे. दरम्यान, या कार्यक्रमास भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके आणि आरपीआयचे संजय बनसोडे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -