घरदेश-विदेशMahashivratri: कोटा येथे शिव मिरवणुकीदरम्यान भीषण अपघात, विजेचा धक्का लागून 18 मुलं...

Mahashivratri: कोटा येथे शिव मिरवणुकीदरम्यान भीषण अपघात, विजेचा धक्का लागून 18 मुलं भाजली

Subscribe

कोटा: कोटा येथे भगवान शिव यांच्या मिरवणुकीत मोठी दुर्घटना घडली. शिव मिरवणुकीत विजेचा धक्का लागून सुमारे 18 मुलं भाजली आहेत. सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली. (Mahashivratri Fatal accident during Shiva procession in Kota 18 injured by lightning)

कोटा येथील कुन्हडी पोलीस स्टेशन परिसरात महाशिवरात्रीनिमित्त शिव मिरवणूक काढण्यात येत असताना, अचानक विजेचा शॉक लागला. त्यामुळे शिव मिरवणुकीत सहभागी झालेले 18 हून अधिक मुलं भाजली आहेत. हे प्रकरण सागतपुरा येथील काली बस्तीचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यात्रेदरम्यान अनेक मुलांनी धार्मिक झेंडे घेतले होते. यावेळी ध्वजाचा विजेच्या तारांना स्पर्श केला आणि करंट लागून जवळपास 18 मुलं भाजली.

- Advertisement -

कोटाच्या पोलीस अधिक्षक अम्रिता दुहन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, ही खूपच दु:खद घटना घडली. काली बस्ती परिसरातील लोक महाशिवरात्रीनिमित्त कलशमध्ये पाणी भरण्यासाठी मिरवणूक काढत होते. यात 20 ते 25 मुलं आणि तेवढ्याच संख्येने महिलाही होत्या. त्यातील एका मुलाकडे 20 ते 22 फुटांच्या लोखंडी पाईपला लावलेला एक झेंडा होता. हा झेंडा रस्त्यावरील हायटेन्शन तारेला लागला. ज्यामुळे तो गंभीररित्या भाजला गेला. त्याला वाचवण्यासाठी इतर मुले पुढे सरसावले मात्र त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. एमबीबीएस हॉस्पिटलमध्ये सर्वांवर उपचार केले जात आहेत.

- Advertisement -

दुहन पुढे म्हणाल्या की, ज्या मुलाच्या हातात झेंडा होता, तो गंभीररित्या भाजला गेला आहे. तर इतर मुलांनाही जखम झाली आहे. या घटनेची निश्चितच चौकशी केली जाईल.

नातेवाईकांकडून आयोजकांना मारहाण

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी काली बस्ती परिसरात मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक मुले स्वत: हून एकटेच या मिरवणुकीत सहभागी झाले होते. विजेचा धक्का लागल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मुलांच्या पालकांना आणि जवळच्या नातेवाईकांना दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णालयातच आयोजकांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याचं सांगितलं जातं.

(हेही वाचा: Uddhav Thackeray : सारे काही उमेदवारीसाठी; शिवसेनाप्रकरणी ठाकरेंचे नार्वेकरांवर गंभीर आरोप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -