घरदेश-विदेशLPG Price Hike : मार्चच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

LPG Price Hike : मार्चच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ

Subscribe

नवी दिल्ली : मार्च महिना सुरू होताच महागाईने सामन्य जनतेला त्रस्त होणार आहे. कारण एलपीजी सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सिलिंडरच्या वाढलेल्या किमती आजपासून लागू झाल्या असून राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1795 रुपये झाली आहे. एलपीजी सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे आता दिल्लीत सिलिंडरची किरकोळ किंमत सिलेंडर 1795 रुपये झाली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1911 रुपये आहे. (LPG Price Hike Another increase in LPG cylinder price on the first day of March)

हेही वाचा – Bangalore Blast : कॅफेतील स्फोटाने बंगळुरू हादरले; चौघे जखमी

- Advertisement -

तेल विपणन कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात 19 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. या वाढीनंतर आता मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर 1749 रुपये, तर चेन्नईत 1960.50 रुपये विकला जात आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात अर्थसंकल्प सादर झालेल्या दिवशीच 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 14 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज 1 मार्च रोजी पुन्हा 19 किलोच्या सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे.

वाढीव किंमत आजपासून लागू

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटवर वाढलेल्या किमतींशी संबंधित माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार आता 19 किलो सिलिंडरची किंमत नवी दिल्लीत 1755.50 पैसे, कोलकातामध्ये 1887 रुपये, मुंबईत 1723 रुपये आणि चेन्नईमध्ये 1937 रुपयांपर्यंत वाढली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shreevats Goswami : भारतीय क्रिकेटपटूकडून मॅच फिक्सिंगचा आरोप; गांगुली यांनी मागवला अहवाल

घरगुती सिलिंडरचे दर स्थिर

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापूर्वी म्हणजे 2024 च्या सुरुवातीला लोकांना काहीसा दिलासा देत तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो सिलिंडरच्या किमतीत थोडीशी कपात केली होती. या काळात दिल्ली ते मुंबई सिलिंडरची किंमत 1.50 पैशांपासून ते 4.50 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहेत. पण या सगळ्यात घरगुती वापरासाठीच्या 14 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती सिलिंडरच्या किंमती 30 ऑगस्ट 2023 रोजी शेवटचा बदलण्यात आल्या होत्या. तेव्हापासून त्याचे दर स्थिर आहेत. सध्या दिल्लीत घरगुती सिलिंडर 903 रुपयांना मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -