Friday, April 26, 2024
घरमानिनीReligiousMakar Sankranti 2024 : संक्रांतीला पतंग का उडवला जातो? जाणून घ्या फायदे

Makar Sankranti 2024 : संक्रांतीला पतंग का उडवला जातो? जाणून घ्या फायदे

Subscribe

हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे अधिक महत्व आहे. या सणापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. तेव्हा मकर संक्रांत साजरी केली जाते. 2024 मध्ये 15 जानेवारीला संक्रांत साजरी केली जाईल. भारतात हा सण विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मकर संक्रांतीला उत्तरायण देखील म्हटलं जातं. तसेच या दिवशी सूर्याची उपासना, स्नान-दानाचे देखील विशेष महत्त्व आहे. याशिवाय मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे.

मकर संक्रांतीला पतंग उडवण्याचे महत्त्व

Makar Sankranti 2024 Festival - Home Celebrations | January 15

- Advertisement -

पौराणिक मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची परंपरा श्री रामांच्या काळापासून सुरु झाली. मकर संक्रांतीला श्री रामांनी देखील पतंग उडवला होता आणि तो पतंग उडत उडत इंद्रलोकात गेला. तेव्हापासून पतंग उडवण्याची प्रथा सुरु झाली.

पतंग उडवण्याचे आरोग्यासाठी फायदे

Makar Sankranti 2022: The Festival of Joy, Hope and Forgiveness

  • पतंग उडवणं शरीरासाठी फायदेशीर मानलं जातं. कारण या काळात हिवाळा असल्याने थंडी खूप असते. पतंग उडवताना आपला उन्हाशी संपर्क जास्त वेळ येतो. ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते आणि त्वचेच्या समस्येपासूव सुटका होते.
  • तसेच पतंग उडवताना होणाऱ्या हालचालींमुळे शरीराचा व्यायाम होतो.
  • यामुळे डोकं शांत राहतं आणि हृदय आनंदी राहतं.

हेही वाचा :

Makar Sankranti 2024 : 14 की 15 जानेवारी? कधी आहे मकर संक्रांत; जाणून घ्या पुण्यकाळ

- Advertisment -

Manini