घरमहाराष्ट्रपुणेDevendra Fadnavis : ज्यांनी केवळ नाटकं केली, त्यांना लोकं घरी बसवतात; फडणवीसांचा...

Devendra Fadnavis : ज्यांनी केवळ नाटकं केली, त्यांना लोकं घरी बसवतात; फडणवीसांचा ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

Subscribe

नवीन नाट्यगृह असतील किंवा जे जुने नाट्यगृह आहेत ते दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी यांनी या देशामध्ये रंगभूमी टिकवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे.

पुणे : चांगल्या तालमी केल्या तर प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो. ज्यांनी केवळ नाटकी केली त्यांना लोकं घरी बसवतात. महाहाराष्ट्राने बघितलं 2019 साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली, काळजात नाही, पाठीत. आणि मग 2022 मध्ये आम्हीही प्रयोग केला आता होती गेली कुठे? त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग सुरूच असतात. असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना लगावला. ते पिंपरी चिंचवड येथे आयोजित शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात आज रविवारी (7 जानेवारी ) बोलत होते. (Devendra Fadnavis Those who only do plays people make them sit at home Fadnavis indirect attack on Thackeray)

नवीन नाट्यगृह असतील किंवा जे जुने नाट्यगृह आहेत ते दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. एक गोष्ट लक्षात घ्या की, मराठी रंगभूमी आणि मराठी रंगकर्मी यांनी यांनी या देशामध्ये रंगभूमी टिकवण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे. देशातील सर्वोत्तम रंगभूमी ही मराठी आहे. जर मग आम्ही सर्वोत्तम असू तर मग टिकवण्याची, जगविण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. त्यामुळे नव्या मुल्यांरुप बदल करावे लागतात. परंतु हे करत असताना शाश्वत मुल्यं जपावी लागतात. मुखपट, बोलपट आले त्यानंतर टीव्ही आले तेव्हा लोक म्हणायची की नाटकं संपतील परंतु तसे झाले नाही. महाराष्ट्रातील मराठी नाट्य रसिक जीवंत आहे तोपर्यंत नाटक संपणार नाही. मराठी रंगकर्मींनी काय केलं तर त्यांनी समृद्ध रसिक तयार केली असेही प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

- Advertisement -

हेही वाचा : Mumbai Trans Harbour Link : न्हावा-शेवा सीलिंकने रायगड जिल्हा बरबाद होणार, राज ठाकरेंचा मराठी माणसाला इशारा

मराठी नाटकं मुलांना, आताच्या पिढींना दाखवले पाहीजे असं अभिनेते प्रशांत दामले म्हणाले, पंरतु मला असं सांगायचं की, जगभरात तुम्ही नाटकांची प्रयोग करत आहात तेव्हा महाराष्ट्रातील नाटक संपणारच नाही. चिंता करू नका, मराठी रसिक तुम्हाला मागे वळून पाहू देणार नाहीत. सोबतच वृद्ध कलावंतासाठी आराखडा तयार करा, त्यासाठी सर्व आर्थिक मदत राज्य सरकार करेल असेही आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

- Advertisement -

हेही वाचा : Fadnavis Vs Wadettiwar : पुरावे द्या, तलाठी भरती परीक्षा रद्द करतो; वडेट्टीवारांच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर

आपल्याकडे कसं तिसरी घंटा वाजली की, नाटक सुरू होतं तसं आमच्या राजकारणातही आहे. आमच्याकडे तिसरी घंटा असते आचार संहितेची, ती वाजली की आम्ही पोझिशन घेतो. पण एक गोष्ट आहे, शेवटी कला, साहित्य, नाट्य, संगित समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. असे प्रतिपादनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -