Tuesday, October 3, 2023
घर मानिनी Religious खूप गंभीर असतात शनिवारी जन्मलेले लोक

खूप गंभीर असतात शनिवारी जन्मलेले लोक

Subscribe

ज्योतिष शास्त्रात कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीसोबतच त्याच्या राशीवरुन किंवा जन्मांकावरुनदेखील त्या व्यक्तीचे गुण, अवगुण, स्वभाव, भविष्य हे सर्व ठरवले जाते. व्यक्तीच्या राशीचा आणि भाग्यांकाचा व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव पाहायला मिळतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का? फक्त रास आणि भाग्यांकच नाही तर व्यक्तीच्या जन्माच्या वारानुसार देखील त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा अंदाज लावला जातो. आज आम्ही तुम्हाला शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींबाबत सांगणार आहोत.

- Advertisement -

शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींवर शनी देवांचा विशेष प्रभाव असतो. हे व्यक्ती खूप ईमानदार आणि मेहनती असतात. यांचा स्वभाव गंभीर आणि शांत असतो. यांना बंधनात राहायला फारसे आवडत नाही. हे व्यक्ती स्वभावाने महत्त्वाकांक्षी, सहनशील आणि विश्वासार्ह असतात. हे खूप स्वाभिमानी देखील असतात. त्यांना इतरांसमोर हात पसरणे आवडत नाही.

अवगुण

हे व्यक्ती खूप मेहनती असतात. मात्र, त्यांना ग्रुपमध्ये काम करायला आवडत नाही. या व्यक्तींना हळूहळू काम करायची सवय असते. ज्यामुळे त्यांना इतरांच्या रागाचा सामना करावा लागतो. हे व्यक्ती सहज कोणासमोर व्यक्त होत नाहीत. ते आपल्या मनातील अनेक गोष्टी कोणाला सांगत नाहीत. या व्यक्तींमध्ये धैर्याची कमतरता असते.

शुभ रंग

- Advertisement -

शनिवारी जन्मलेल्या व्यक्तींचा शुभ रंग निळा आणि काळा आहे.


हेही वाचा :

शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्तींवर असते देवी लक्ष्मीची कृपा

- Advertisment -

Manini