घरदेश-विदेशDU Political Science: 'सारे जहाँ से अच्छा...' आता शिकवलं जाणार नाही; कवी...

DU Political Science: ‘सारे जहाँ से अच्छा…’ आता शिकवलं जाणार नाही; कवी इक्बाल अभ्यासक्रमाबाहेर

Subscribe

प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांचे नाव आता दिल्ली विद्यापीठाच्या बीए कार्यक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता डीयूमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कवी इक्बाल यांच्याबद्दल शिकवले जाणार नाही. आतापर्यंत इक्बाल यांना बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात शिकवले जात होते

प्रसिद्ध कवी मोहम्मद इक्बाल यांचे नाव आता दिल्ली विद्यापीठाच्या बीए कार्यक्रमातून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता डीयूमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कवी इक्बाल यांच्याबद्दल शिकवले जाणार नाही. आतापर्यंत इक्बाल यांना बीए राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात शिकवले जात होते. दिल्ली विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या मंजुरीनंतर कवी इक्बाल अभ्यासक्रमातून काढून टाकण्यात येणार आहेत . याशिवाय इतर काही प्रस्तावांनाही शैक्षणिक परिषदेने मंजुरी दिली आहे. ( Delhi University Academic council Proposed drops of Mohammad Iqbal from political science syllabus )

इक्बाल हे उर्दू आणि पर्शियन भाषेतील प्रसिद्ध कवी आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र ऐकले जाणारे ‘सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा’ हे गाणे इक्बाल यांनी लिहिले आहे. इक्बाल यांना पाकिस्तानचे राष्ट्रीय कवी म्हटले जाते. खरंतर पाकिस्तान बनवण्यामागे कवी इक्बाल यांचचं डोकं असल्याचं म्हटलं जातं. त्यांना अल्लामा इक्बाल असेही म्हणतात. कवी इक्बाल यांना अभ्यासक्रमातून काढून टाकण्याबाबतचा अंतिम निर्णय कार्यकारी परिषदेने घ्यायचा असून, त्यांची बैठक ९ जून रोजी होणार आहे.

- Advertisement -

फाळणी, हिंदू आणि आदिवासी

फाळणीचा अभ्यास, हिंदू आणि आदिवासी अभ्यास यावर स्वतंत्र केंद्रे असावीत असा प्रस्ताव शैक्षणिक परिषदेसमोर मांडण्यात आला. त्याला आता परिषदेने मान्यता दिली आहे. बीए पॉलिटिकल सायन्स अभ्यासक्रमाच्या ‘मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट’ या अध्यायात कवी इक्बाल यांना सविस्तरपणे शिकवले जायचे. अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरमध्ये हा धडा शिकवला जात होता. शैक्षणिक परिषदेच्या पाच सदस्यांनी विभाजन अभ्यास केंद्र स्थापन करण्यास विरोध केला. या परिषदेत 100 सदस्य आहेत.

डीयू शैक्षणिक परिषदेच्या पाच सदस्यांनी फाळणीच्या अभ्यासाला प्रत्यक्षात फूट पाडणारे म्हटले आहे. गेल्या १३०० वर्षांतील आक्रमणे, यातना आणि गुलामगिरीचा विशेष अभ्यास या केंद्रात केला जाईल. एका निवेदनात म्हटले आहे की, 1300 वर्षांच्या इतिहासावरील चर्चेमुळे जातीय भाषणांची संधी मिळेल.

- Advertisement -

( हेही वाचा: नितीश कुमारांना उशिरा सुचलेले शहाणपण, विचारतात – वेगळ्या संसद भवनाची गरज काय? )

एका निवेदनात, ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) ने कवी इक्बाल यांना राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातून वगळण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ABVP ने इक्बाल यांचे एक कट्टर धार्मिक विद्वान म्हणून वर्णन केले, ज्यांना पाकिस्तानचे ‘तात्विक पिता’ म्हटले जाते. जिन्ना यांना मुस्लिम लीगमध्ये उभे करण्यामागे इक्बालचा हात होता. मोहम्मद अली जिन्ना यांच्याप्रमाणेच मोहम्मद इक्बालही भारताच्या फाळणीला जबाबदार असल्याचे अभाविपने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -