Wednesday, February 21, 2024
घरमानिनीReligiousचंद्रदेवाने केली होती श्री सोमनाथ मंदिराची स्थापना; जाणून घ्या कथा

चंद्रदेवाने केली होती श्री सोमनाथ मंदिराची स्थापना; जाणून घ्या कथा

Subscribe

हिंदू धर्मात अनेक ग्रंथ आणि पुराण, वेद आणि उपनिषदे आहेत. ज्यातून अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. शिव महापुराणात देखीस सर्व 12 ज्योतिर्लिंगांची माहिती देण्यात आली आहे. ज्यातून 12 ज्योतिर्लिंगांबाबात अनेक रहस्य सांगितली जातात. गुजरातमधील सोमनाथ मंदिर हे सर्व ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि विशेष आहे. सोमनाथ मंदिराची उंची सुमारे 155 फूट असून हे मंदिर महादेवांना समर्पित आहे. सोमनाथ मंदिर प्रभास पाटण येथे आहे.

सोमनाथ मंदिरावर झाले होते अनेक हल्ले

Somnath Temple- Significance | Structure | Mythologyसोमनाथ मंदिराच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास या मंदिरावर अनेकदा हल्ले झाले आहेत. यावेळी मंदिराची तोडफोड देखील करण्यात आली होती. इतिहासात जवळपास या मंदिरावर एकूण 17 वेळा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर प्रत्येकवेळी मंदिराचा जीर्णौद्धार करण्यात आला.

- Advertisement -

सोमनाथ मंदिराची पौराणिक कथा

Somnath temple - Wikipedia

पौराणिक कथेनुसार, सोमनाथ मंदिर चंद्रदेवाने बांधले होते आणि त्यांनीच मंदिरातील शिवलिंगाची स्थापना केली होती. चंद्रदेवाचे एक नाव सोम असल्यामुळे या ज्योतिर्लिंगाचे नावही सोमनाथ पडले. असं म्हटलं जातं की, प्रजापती दक्षने आपल्या 27 मुलींचा विवाह चंद्रासोबत केला होता.

- Advertisement -

परंतु चंद्रदेव आपल्या सर्व पत्नींपैकी रोहिणीवर सर्वात जास्त प्रेम करत होते. ही गोष्ट दक्ष प्रजापतीला कळल्यावर त्याने रागात चंद्रदेवांना शाप दिला की, त्याचे तेज हळूहळू कमी होईल. शापामुळे चंद्रदेवाचे तेज हळूहळू कमी होऊ लागले. यावेळी त्यांनी महादेवांची आराधना केली. जेव्हा महादेव प्रसन्न झाले तेव्हा चंद्रदेवांना शापमुक्त केले.

Somnath Temple | Tourism Places to Visit & Travel Guide to Somnathत्यानंतर चंद्रदेवांनी इतर देवतांसह मृत्युंजय मंत्राचा जप करत माता पार्वतीजींसोबत शिव शंकरांनी या ठिकाणी सदैव निवास करावा अशी प्रार्थना केली. महादेवाने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि तेव्हापासून ज्योतिर्लिंगाच्या रूपात माता पार्वतीसोबत येथे राहू लागले.


हेही वाचा :

सोमवारी जन्मलेले लोक कसे असतात?

- Advertisment -

Manini