घरक्राइमCrime : अपघातात पत्नीचा मृत्यू अन् पतीने स्वतःविरोधात दाखल केली तक्रार; काय...

Crime : अपघातात पत्नीचा मृत्यू अन् पतीने स्वतःविरोधात दाखल केली तक्रार; काय आहे प्रकरण?

Subscribe

गुजरात : देशातील प्रत्येत शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. मात्र गुजरात राज्यात ही समस्या इतकी मोठी आहे की, भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना मॉर्निंग वॉक करणे कठीण होत आहे आणि हे गुजरात उच्च न्यायालयानेही मान्य केले होते. अशातच आता भटक्या कुत्र्यामुळे कार अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. मात्र तिच्या पतीने स्वत:विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील आहे. (Gujrat Crime Death of wife in an accident and husband filed a complaint against himself What is the matter)

हेही वाचा – Blast in MP : मध्य प्रदेशात फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 11 मृत, 59 जखमी

- Advertisement -

भटक्या कुत्र्याने कारसमोर उडी मारल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील ताबा सुटला कार बॅरिकेट्सला जाऊन धडकली. यावेळी कारमध्ये बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला. मात्र यानंतर आता महिलेच्या पतीने पत्नीच्या मृत्यूसाठी स्वत:ला जबाबदार धरले आहे. एवढेच नाही तर त्याने आरोप केला आहे की, त्याच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. याचपार्श्वभूमी 55 वर्षीय परेश दोषी यांनी स्वत:विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

परेश दोषी यांनी तक्रारीत म्हटले की, मी आणि माझी पत्नी अमिता आम्ही दोघे रविवारी पहाटे अंबाजी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. मात्र मंदिर बंद होते, त्यामुळे आम्ही दुपारी 1.30 वाजेपर्यंत थांबलो आणि दर्शन घेऊन घरी येण्यासाठी निघालो. यावेळी खेरोज-खेडब्रह्मा महामार्गावरील दान महुडी गावाजवळ अपघात झाला. मी सुका अंबा गावाकडे जात असताना आमच्या गाडीसमोर अचानक एक भटका कुत्रा आला. यावेळी कुत्र्याला धडकू नये म्हणून मी गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पण गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या बॅरिकेट्सला धडकली.

- Advertisement -

हेही वाचा – Pimpari- Chinchwad: धक्कादायक; संचालकाकडून अल्पवयीन मुलीवर दोन वर्षे बलात्कार

बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळेच अमिताचा मृत्यू

कार ऑटो लॉक असल्याने आम्ही दोघेही कारमध्ये अडकलो होता. यावेळी बॅरिकेट्सचा काही भाग कारच्या खिडकीला आत घुसला होता आणि माझी पत्नी अमिता गंभीर जखमी झाली होती. तिला मी सीटवर बसवले. मात्र आम्हाला बाहेर पडता येत नव्हते. अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूचे लोक आम्हाला वाचवण्यासाठी धावले. यावेळी कोणीतरी खिडकीची काच फोडली आणि आम्हाला दोघांना बाहेर पडण्यास मदत केली. यानंतर अमिताला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मी बेदरकारपणे गाडी चालवण्यामुळेच अमिताचा मृत्यू झाला आहे, असे म्हणत परेश दोषी यांनी स्वत:विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -