घरदेश-विदेशLok Sabha 2024 : हा तर गैरमार्गाने मिळवलेला विजय; उद्धव गटाचा पंतप्रधानांवर...

Lok Sabha 2024 : हा तर गैरमार्गाने मिळवलेला विजय; उद्धव गटाचा पंतप्रधानांवर हल्ला

Subscribe

Lok Sabha 2024 : सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा गैरमार्गाने मिळवलेला विजय हीच मोदींची लोकशाही. देशाला ती मान्य नाही. लोकसभेत भाजपने खाते उघडले असे या विजयानंतर सांगितले गेले. प्रत्यक्षात मोदी यांनी अशा पद्धतीने हुकूमशाहीचेच खाते उघडले आणि त्याची सुरुवात गुजरातमधून केली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान लवकरच पार पडणार आहे. एकूण सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. पण त्यापूर्वीच गुजरात आणि देशात भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. गुजरातच्या सुरतमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद ठरला तर, उर्वरित आठ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे मुकेश दलाल बिनविरोध निवडून आले. यावरूनच आता उद्धव गटाने ‘सामना’ अग्रलेखातून पंतप्रधानांवर टीका केली आहे. (Lok Sabha 2024 surat lok sabha constituency victory of bjp candidate narendra modi dictectorship)

ही लोकशाही देशाला मान्य नाही

सुरत लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा गैरमार्गाने मिळवलेला विजय हीच मोदींची लोकशाही. देशाला ती मान्य नाही. लोकसभेत भाजपने खाते उघडले असे या विजयानंतर सांगितले गेले. प्रत्यक्षात मोदी यांनी अशा पद्धतीने हुकूमशाहीचेच खाते उघडले आणि त्याची सुरुवात गुजरातमधून केली. मोदी नावाचा एक माणूस देशाच्या पंतप्रधानपदी आला आणि गेला याचे स्मरणही देशाला राहणार नाही. ‘सुरत’ प्रकरणानंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले. भारताचा निवडणूक आयोग आणि देशाची प्रशासकीय यंत्रणा मोदी सरकारची गुलाम झाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? पवारांचा पंतप्रधानांवर हल्ला

हा तर निव्वळ फार्स

गुजरातमधील ‘सुरत’ लोकसभा जागा भाजपने ज्या पद्धतीने बिनविरोध जिंकली ही एक प्रकारे लोकशाहीची लूट आणि बळजबरीच आहे. भाजपने विजयाचे खाते अशा प्रकारे उघडले. सुरतमधील काँगेस उमेदवाराचा अर्ज आधी रद्द केला व इतर आठ उमेदवारांना आपले अर्ज मागे घ्यायला लावले. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल हे एकमेव उमेदवार रिंगणात राहिल्याने त्यांना खासदार म्हणून विजयी घोषित केले. हा सर्वच प्रकार संशयास्पद आणि धक्कादायक आहे. भाजपच्या या विजयात हुकूमशाहीचे खरे दर्शन घडले. आपला लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार काढून घेणे म्हणजे डॉ. आंबेडकर यांचे संविधान नष्ट करण्याच्या दिशेने पाऊल पडले आहे, असे टीकास्त्र राहुल गांधी यांनी सोडले आहे. सुरतचा प्रकार लोकशाही बदसुरत करणारा आहे. गुजरातमध्ये गेल्या वीस एक वर्षांपासून लोकशाहीच्या नावाखाली झुंडशाही सुरूच आहे. कायदा, न्याय, इमान वगैरे विषयांना येथे स्थान नाही. निवडणुका हा येथे एक फार्स बनला असल्याचा टोला या अग्रलेखातून मोदींना लगावला आहे. भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील म्हणाले की, सुरतने पंतप्रधान मोदींना पहिले ‘कमळ’ भेट दिले आहे. मोदी यांनी हे कमळ हातात घेणे हा लोकशाहीचा अपमान आहे. सुरतचे पहिले कमळ भाजपच्या 399 कमळांच्या पराभवास कारणीभूत ठरेल हे आमचे ठाम मत आहे, आणि असेच होणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (Lok Sabha 2024 surat lok sabha constituency victory of bjp candidate narendra modi dictectorship)

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha 2024 : मोदी हे खोटं बोलणारे नेते, 4 जूननंतर पंतप्रधान राहणार नाहीत; संजय राऊतांची टीका


Edited by : Ashwini A. Bhatavdekar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -