घरक्राइमTerror Attack : दोन राज्य होती टार्गेटवर; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून नवीन खुलासा

Terror Attack : दोन राज्य होती टार्गेटवर; पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांकडून नवीन खुलासा

Subscribe

पुणे : मागील वर्षी कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरी करताना तिघांना पकडले होते. चौकशीत तिघेही दहशतवादी असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर या तिन्ही दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी एटीएसकडे आणि नंतर एनआयएकडे सोपविले होते. तिन्ही दहशतवाद्यांनी सोन्याच्या दुकानातून लाखो रुपयांचे दागिने आणि रोकड लंपास करून रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरल्याची धक्कादायक माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती. यानंतर आता दोन राज्य टार्गेटवर असल्याची माहिती समोर येत आहे. (Terror Attack Two states were targeted New revelations from terrorists caught in Pune)

हेही वाचा – Nirmala Sitharaman : सरकारने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून पैसे उकळले; निर्मला सीतारामन म्हणतात…

- Advertisement -

पुण्यात 18 जुलै 2023 ला रात्रगस्तीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनंतर या प्रकरणातील आरोपींची संख्या पुढे तपासात 11 वर जाऊन पोहोचलीय. एनआयएकडून या प्रकरणात आणखी चार दहशतवाद्याच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र दुसरीकडे गेल्या वर्षी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे.

दहशतवाद्यांनी पुण्यातील कोंढवामध्ये बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. बॉम्ब तयार करण्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी काही ठिकाणी नियंत्रीत स्फोट घडलून आणले होते. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता. पुण्यात हा कट रचण्यात आल्याची माहिती एनआयएच्या तपासात समोर आली आहे. त्यामुळे एनआयएच्या तपासात आणखी कोणते नवीन खुलासे होतात आणि या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत पोहचतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Eknath Khadse : रावेर मतदारसंघातून मी किंवा रोहिणी खडसे उमेदवार नाहीत; एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण

दरम्यान, दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील एक सोन्याचं दुकानं लुटलं होतं. त्यांनी या दुकानातून लाखो रुपये किमतीचे दागिने आणि रोकड लंपास केली. दहशतवाद्यांनी हे सोन्याचं दुकान टेरर फंडिंगसाठी लुटल्याचं एएनआयच्या तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने तिघांनाही 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.मोहम्मद शहानवाज आलम शफीउजमा खान उर्फ अब्दुल्ला उर्फ इब्राहीम (31, रा. झारखंड), मोहम्मद युनुस मोहम्मद याकुब साकी उर्फ छोटु (27, रा. मध्यप्रदेश रतलाम) आणि जुल्फिकार अली बरोडावाला उर्फ लाला उर्फ लालाभाई (44, रा. भिवंडी, ठाणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -