रक्षाबंधन, भाऊबीज, वाढदिवस तसेच कोणत्याही शुभकार्यात जाताना आपण आर्वजून गिफ्ट खरेदी करतो. आपलं गिफ्ट नेहमीच इतरांपेक्षा हटके असावं अस प्रत्येकालाच वाटतं. पण अनेकदा यामुळे काहीजण अशा काही वस्तू गिफ्ट करतात. ज्या ज्योतिष शास्त्रानुसार भेट म्हणून देणं योग्य मानलं जात नाही.
या वस्तू कधीही गिफ्ट म्हणून देऊ नये
- देवी-देवतांची मूर्ती
शास्त्रानुसार, देवी-देवतांची मूर्ती किंवा फोटो कोणाला भेट म्हणून देऊ नये. कारण, कधीही देवी-देवतांना भेट म्हणून देणे योग्य मानले जात नाही.
- धारदार वस्तू
कात्री, सुरी, सुई किंवा कोणतीही लोखंडी वस्तू कोणालाही भेट देऊ नये. यामुळे परस्पर संबंध बिघडू शकतात.
- चामड्याच्या वस्तू
शास्त्रानुसार, शूज, चप्पल, बेल्ट, पर्स या चामड्याच्या वस्तू कोणालाही भेट देऊ नयेत. कारण, या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा असते.
- काचेची भांडी
अनेकजण गिफ्ट म्हणून काचेच्या भांड्याचा सेट गिफ्ट करतात. पण शास्त्रानुसार, काचेची भांडी गिफ्ट म्हणून देणं योग्य मानलं जात नाही. काचेची भांडी शुक्र ग्रहा संबंधित आहेत. हे गिफ्ट म्हणून दिल्यास शुक्र ग्रह खराब होतो.
हेही वाचा :