घरराजकारणLoksabha Election 2024 : वाढत्या उन्हासोबत रायगडमधील राजकारणही तापलं

Loksabha Election 2024 : वाढत्या उन्हासोबत रायगडमधील राजकारणही तापलं

Subscribe

रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचार आता जोशात केला जात आहे. महायुतीचे सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि महाविकास आघाडीचे अनंत गीते (ठाकरे गट) यांच्यात थेट सामना होत आहे. सध्या दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याने निवडणुकीचा प्रचार विकासाच्या मुद्द्यावरून घसरल्याचे चित्र आहे.

महाड : लोकसभा निवडणुकीत दिवसेंदिवस रंग भरू लागले आहेत. पाऱ्याने चाळीसी पार केली आहे तर इकडे प्रचारातील आरोप-प्रत्यारोपांमुळे रायगड जिल्ह्यातील रायकीय वातावरणही तापू लागले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार आहेत. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे अनंत गीते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. गेल्या निवडणुकीत (२०१९) तटकरेंनी गीतेंचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता.

रायगड आणि मावळ लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रायगडसह कोकणातील लोकसभा मतदारसंघांमधून उभ्या राहिलेल्या उमेदवाराकडून प्रचाराचे नारळ फोडले गेले आहेत. आपापल्या परीने कामाचा आलेख मतदारांकडे मांडण्याचे काम उमेदवार करत आहेत. मात्र आपले काम सांगताना आणि विरोधकांवर तोंडसुख घेताना उमेदवारांची जीभ घसरत आहे. विकासाच्या मुद्द्यांवर बोलायचे टाळून एकमेकांच्या खासगी मालमत्तेचा आणि संपत्तीचा आलेख मांडला जात आहे. यातून मतदारांची चांगलीच करमणूक होत असली तरी ज्या कारणासाठी मतदार उमेदवारांना निवडून देतात त्या विकासाच्या मुद्द्यांना बगल दिली जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Raigad District News : रायगड जिल्हात ‘जलजीवन’च्या ‘गारंटी’चे तीन तेरा

रायगड लोकसभा मतदारसंघांत सुनील तटकरे आणि अनंत गीते या प्रचार सुरू केला आहे. रायगडसह खेड, दापोली या भागांत सभा घेतल्या जात आहेत. या सभांमधून अनंत गीते यांनी सुनील तटकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तर गीते यांच्या टीकेला प्रतिउत्तर देताना सुनील तटकरे हे देखील प्रत्युत्तर देत आहेत. या आरोप-प्रत्यारोपामुळे रायगड मधील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Pen News : दीड फुटाची संरक्षक भिंत कसा जीव वाचवणार?

या वाढलेल्या राजकीय तापमानात आता भाजपचे धैर्यशील पाटील समर्थकांचीदेखील भर पडली आहे. त्यांच्याकडून तटकरेंच्या उमेदवारीला जागोजागी विरोध दर्शवला जात आहे. रायगड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने धैर्यशील पाटील यांचा चेहरा समोर आणला गेला होता. मात्र, महायुती झाली आणि विद्यमान खासदार म्हणून ही जागी राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यामुळे तयारी करणाऱ्या धैर्यशील पाटील यांना ब्रेक लागला आहे. सुरुवातीला तिन्ही आमदार आणि धैर्यशील पाटील यांच्या समर्थकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यामुळे आधीच तापू लागलेले राजकीय वातावरण आता पुन्हा एकदा चांगलेच तापू लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -