घरदेश-विदेशLive Updates : मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति...

Live Updates : मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा

Subscribe

मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा


सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या सुट्टी

- Advertisement -

अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर खबरदारी म्हणून सुट्टी

दिपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिली माहिती

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी खरा पक्ष असल्याचा दावा करत ECIकडे  सादर केली कागदपत्रे

भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांना खरा पक्ष असल्याचा दावा करत आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 3 आठवड्यांच्या आत याची पुष्टी करण्यास सांगितले


दिल्लीतील प्रगती मैदानावरील कन्व्हेन्शन सेंटरचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन

कन्व्हेन्शन सेंटरला ‘भारत मंडपम’ नाव

काही वर्षानंतर टीका करणारेच कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाषण देतील – मोदी


शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (28 जुलै) होणार अत्यंसंस्कार

शिरीष कणेकर यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार

शिरीष कणेकर यांचे पार्थिव तत्पूर्वी शुक्रवारी सकाळी अकरा ते एक या वेळेत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार


मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस;अंधेरी सब वेमध्ये पाण्याखाली, वाहतुकीसाठी बंद


कोळसा घोटाळा प्रकरण : विजय दर्डा आणि त्यांचे सुपुत्र देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षांची शिक्षा

दिल्ली विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे


हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात एकाचा मृत्यू; लोखंडी गेट अंगावर पडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.


 

लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यास लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडून मंजुरी


कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडले


पक्ष बांधणीसंर्भात राज ठाकरेंची पुण्यात बैठक


मणिपूरच्या हिंसाचारावर मोदींनी निवेदन द्यावे – विरोधक

लोकसभा अध्यक्षांना अविश्वास प्रस्तावाची नोटीस; विरोधकांच्या गोंदळानंतर लोकसभा 12 वाजेपर्यंत तहकूब


काँग्रेसने अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली


मोदी सरकारविरोधात विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव

मणिपूरच्या मुद्यावरून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; लोकसभेत गदारोळ सुरू


दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली


संसदेत आज सकाळी 10 वाजता विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे.


राज्यातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक घेणार

अजित पवार जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार; ही बैठक आज सकाळी 11 वाजता सुरु होईल


रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


मुंबईला पाणीपुरवठा करणारे तुळसी आणि तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -