घरमहाराष्ट्रपुणेPune Crime : उधारी वसुलीसाठी सावकाराकडून पतीसमोरच पत्नीवर अत्याचार आणि व्हिडीओही बनवला

Pune Crime : उधारी वसुलीसाठी सावकाराकडून पतीसमोरच पत्नीवर अत्याचार आणि व्हिडीओही बनवला

Subscribe

Pune Crime : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील (Pune) हडपसर (Hadapsar) येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने हातउसने घेतलेले पैसे परत केल्यामुळे एका खासगी सावकाराने (Private Lender) त्या व्यक्तीच्या समोर त्याच्या पत्नीवर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर त्या सावकाराने बलात्कार करतानाचा व्हिडीओ (Video) बनवून सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने सावकाराविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime To recover the loan the moneylender tortured the wife in front of the husband and also made a video)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय पीडित महिलेचा पती उदरनिर्वाहासाठी बॅगा विकण्याचे काम करतो. त्याने आरोपी सावकाराकडून 40 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र तो ते परत करून शकला नाही. त्यामुळे आरोपीने आधी पिडित महिला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने हडपसर येथील म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. त्यानंतर पीडितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. सावकार एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पीडितेच्या पतीसमोरच तिच्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला.

हेही वाचा – Pune crime : ‘त्या’ दहशतवाद्यांनी केला होता सातारा, कोल्हापुरात बॉम्ब फोडण्याचा सराव

- Advertisement -
व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर महिलेची पोलिसात तक्रार
आरोपीने यानंतर त्याने पीडित महिलेकडे शरीर संबंधची मागणी केली. मात्र महिलेने नकार दिल्यामुळे चिडलेल्या आरोपीने त्याच्या घरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेकॉर्ड झालेला व्हिडीओ पीडित महिलेच्या पतीला पाठवला आणि सोशल मीडियावर अपलोड केला. ही बाब पीडित महिलेल्या लक्षात आल्यावर तिने हडपसर पोलीस गाठले आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ आरोपी इम्तियाज हसीन शेख (47) याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा – ‘जत’मध्ये पाऊसच नाही, म्हैसाळ योजनेसाठी निधी कधी मिळणार? विश्वजीत कदमांचे सरकारवर ताशेरे

गेल्यावर्षी सावकाराच्या जाचाला कंटालून व्यक्तीने केली होती आत्महत्या

दरम्यान, पुण्यात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून सहकार विभागातील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. गणेश शंकर शिंदे असे व्यक्तीचे नाव होते. त्यांने सुसाइड नोटमध्ये सावकारांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्य करत असल्याचे म्हटले होते. व्यक्तीने सावकारांकडून 20 ते 25 टक्के व्याजदराने सुमारे 84 लाख 50 हजार रुपये कर्ज घेतले होते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -