घरमहाराष्ट्रPraniti Shinde : अडचणी निर्माण करूनही 'रे नगर' प्रकल्प केला पूर्ण; माकप...

Praniti Shinde : अडचणी निर्माण करूनही ‘रे नगर’ प्रकल्प केला पूर्ण; माकप नेते आडम यांची प्रणिती शिंदेंवर टीका

Subscribe

पंतप्रधान मोदी हे उद्या (19 जानेवारी) 10 वाजून 45 मिनिटांसाठी सोलापुरात येणार आहे. सोलापूरमध्ये कुंभारी येथे उभारण्यात आलेल्या 'रे नगर' गृहप्रकल्पात 15 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सोलापूर दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपाकडून ऑफर दिली आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी स्वत: केला होता. यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. ‘मी काँग्रेस सोडून कुठेही जाणार नाही’, असेही सुशीलकुमार शिंदेंनी स्पष्ट केले. यात सोलापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर ‘रे नगर’ गृहप्रकल्प अंतिम टप्प्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण होऊ नये म्हणून प्रणिती शिंदेंनी अनेक अडचणी निर्माण केला होता. पण प्रणिती शिंदेच्या नकावर टिच्चून हा प्रकल्प पूर्ण केला आहे, अशी टीका कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केले आहेत.

नरसय्या आडम यांच्या संकल्पनेतील सोलापूरच्या कुंभारी येथे ‘रे नगर’ गृहप्रकल्प हा असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलीआहे. ही वसाहत बांधताना शिंदे कुटुंबीयांनी अनेक अडचणी निर्माण केल्याचा आरोप नरसय्या आडम यांनी केला. शिंदे कुटुंबीयांवर टीका करताना नरसय्या आडम म्हणाले, “हा प्रकल्पू पूर्ण करताना काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंनी खूप अडचणी निर्माण केल्या होत्या. पण 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पाविरोधात खोटा प्रचार देखील केला गेला. तेव्हाचे राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना देखील माझ्याविरोधात खोट्या माहिती देऊन प्रकल्पाचा फंड रोखला होता. पण शिंदे कुटुंबीयांच्या नाकावर टिच्चून ‘रे नगर’ गृहप्रकल्प मी अंतिम टप्प्यात आणला आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : मोदी ऐंशीच्या पुढे गेल्यावर त्यांनाही विचारू; पटोलेंच्या टीकेला अजितदादांचे उत्तर

सोलापूरच्या ‘रे नगर’ गृहप्रकल्प तब्बल तेरा वर्षापासून काम सुरू होते. 2019साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गृहप्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मी स्वत: याच्या उद्घाटन येणार असल्याचा शब्द पंतप्रधान मोदींनी दिला होता. अखरे पंतप्रधान मोदींनी दिलेला शब्द पाळला आहे. यानुसार उद्या 19 पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूरमध्ये घराचे वितरण होणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ayodhya Makeover : शरयू तीरावरी अयोध्या ‘गोकर्ण’निर्मित नगरी; रामलल्लाच्या नगरीचा मेकओव्हर करणारे मराठमोळे नितीन गोकर्ण

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी पाच हजार पोलीस तैनात

पंतप्रधान मोदी हे उद्या (19 जानेवारी) 10 वाजून 45 मिनिटांसाठी सोलापुरात येणार आहे. सोलापूरमध्ये कुंभारी येथे उभारण्यात आलेल्या ‘रे नगर’ गृहप्रकल्पात 15 हजार घरांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. रे नगर प्रकल्पासह महाराष्ट्रात पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या एकूण 90 हजार घरांचे लोकार्पण देखील होणार आहे. पंतप्रधानाच्या दौऱ्यासाठी सोलापूर जवळपासू पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -