घरमहाराष्ट्रपुणेIPS Priyanka Narnaware : चोर सोडून संन्याशाला फाशी; बिर्याणी मागविणारा अधिकारी सोडून...

IPS Priyanka Narnaware : चोर सोडून संन्याशाला फाशी; बिर्याणी मागविणारा अधिकारी सोडून कर्मचाऱ्याचेच रोखलं वेतन

Subscribe

पुणे येथील तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी हॉटेलमधून फुकट बिर्याणी मागितल्याचे प्रकरण पुण्यात काही वर्षांपूर्वी जोरदार गाजले होते. या फूकट बिर्याणीची ऑडिओ क्लिपही महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती. या व्हायरल ऑ़डिओ क्लिपवर सोशल मीडियातून उलट-सुलट कमेंट्स पडल्या होत्या.

पुणे : तुम्हाला आठवतेय, पुण्यातील एका आयपीएस महिला अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्याला फोन करून साजूक तुपातील बिर्याणी मागविली होती. एवढंच नव्हे तर आपल्या हद्दीतील हॉटेल चालकांना पैसे द्यावे लागतात का? असा सवालही केला होता. त्याच प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. याप्रकरणात कारवाई पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आली असून, त्याचे तीन वर्षाचे वेतन रोखण्यात आलं आहे. (IPS Priyanka Narnaware Sannyasa hanged for leaving thief Except the officer who ordered the biryani only the employees salary was withheld​)

पुणे येथील तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी हॉटेलमधून फुकट बिर्याणी मागितल्याचे प्रकरण पुण्यात काही वर्षांपूर्वी जोरदार गाजले होते. या फूकट बिर्याणीची ऑडिओ क्लिपही महाराष्ट्रभर व्हायरल झाली होती. या व्हायरल ऑ़डिओ क्लिपवर सोशल मीडियातून उलट-सुलट कमेंट्स पडल्या होत्या. तेव्हा तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणात ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या पोलीस कर्मचारी महेश नाईक यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. आता नाईक यांची तीन वर्षांसाठी वेतनवाढ रोखण्यात आली आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलिन करण्याचा आरोप त्यांचावर ठेवला आहे. परंतु आयपीएस अधिकाऱ्यावर काहीच कारवाई झाली नाही हे विशेष.

- Advertisement -

हेही वाचा : Ram Mandir : संजय राऊत यांचे ‘ते’ वक्तव्य भाजपाकडून ट्वीट, पण नेमका संदर्भ काय?

काय होते प्रकरण?

आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांची पाच मिनिटांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी मटन बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एक नॉनव्हेज डीश ऑर्डर करण्याचे आपल्या सहकाऱ्यास सांगत आहे. हे सर्व चांगल्या हॉटेलमधून आणा. जास्त तेलकट आणि तिखटही नको. चवही चांगली पाहिजे. तसेच हॉटेल आपल्या कार्यक्षेत्रात असेल तर पैसे देण्याची गरज नाही, असे त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणल्या होत्या. हे प्रकरण डिसेंबर 2020 ते जुलै 2012 च्या दरम्यानचे आहे. संभाषणाची ऑडिओ क्लिप ही डिसेंबर 2020 मधील असताना ते जुलै 2021 प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा : Nashik: बाहेर आंदोलन, आत वाढदिवस साजरा; आदिवासी विकास विभागात नेमकं चालंलय काय?

पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका

पुण्याच्या तत्कालीन पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची पाच मिनिटांची ऑडियो क्लिप व्हायरल झाली होती. या प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्या संभाषणाची रेकॉर्डिंग करणे आणि ते माध्यमांना देणे, यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्यात आल्याचा ठपका ठेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -