घरताज्या घडामोडीSwami Prasad Maurya : देवी-देवतांबद्दलच्या वक्तव्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य अडचणीत; वाचा, काय...

Swami Prasad Maurya : देवी-देवतांबद्दलच्या वक्तव्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य अडचणीत; वाचा, काय म्हणाले होते

Subscribe

लखनऊ – समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस, तथा माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हा दाखल करुन सात दिवसांता एफआयआर कॉपी कोर्टात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हिंदू देवी-देवतांविरोधात वादग्रस्त वक्तव्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य अडचणीत आले आहेत. देवी-देवतांविरोधात वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल आणि समाजात द्वेष पसरवण्याच्या आरोपांखाली माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहे. एमपीएमएलए कोर्टाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबरीश श्रीवास्तव यांनी वजीरगंज पोलीस ठाण्याच्या प्रभारींना मौर्य यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

एमपीएमएलए  कोर्टाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश 

स्वामी प्रसाद मौर्य यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारी याचिका न्यायलयात दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायदंडाधिकाऱ्यांनी शनिवारी (16 मार्च) निर्णय दिला. गेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी स्वामी प्रसाद मौर्य यांनी ट्विटवर एक फोटो पोस्ट करुन काही मजकूर लिहिला होता. 12 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हिंदू लक्ष्मीपूजन करतात. मौर्य यांनी त्यांच्या पत्नीची पूजा करून काही फोटो ट्विटरवर शेअर केले. तसेच हे फोटो शेअर करताना त्यांनी देवी लक्ष्मीबद्दल काही वक्तव्य केले होते.

- Advertisement -

देवी लक्ष्मीऐवजी पत्नीचा पूजा करा- स्वामी प्रसाद मौर्य

स्वामी प्रसाद मौर्य यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की, दीपोत्सवानिमित्त मी माझ्या पत्नीची पूजा आणि तिचा सन्मान केला. जगातल्या कुठल्याही धर्मात, जातीत, वंश, रंग अथवा देशात जन्मलेल्या मुलाला दोन हात, दोन पाय, दोन कान, दोन डोळे आणि एक नाक, एक डोकं असते. परंतु, चार हात, आठ हात, दहा हात, वीस हात, हजार हात असलेलं मूल अद्याप या जगात जन्माला आलेली नाहीत. मग चार हात असलेली लक्ष्मी कशी जन्माला येऊ शकते? तुम्हाला लक्ष्मीची पूजा करायची असेल तर तुम्ही तुमच्या पत्नीची पूजा करा, तिचा आदर करा. कारण ती तुमच्या कुटुंबाचं पालनपोषण करते, घरात सुख-समृद्धी नांदेल याची काळजी घेते. तसेच आपली जबाबदारी पार पाडते. या पोस्टवर आक्षेप घेण्यात आला होता.

स्वामी प्रसाद मौर्य यांनी यापूर्वीदेखील हिंदू देवी-देवतांबद्दल वक्तव्ये केली आहेत. दिवाळीपूर्वी एका कार्यक्रमात ते म्हणाले होते, अयोध्येतील श्री रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही एक प्रकारची फसवेगिरी आहे. एका कार्यक्रमात त्यांनी रामायणातील काही ओळी वाचून वादग्रस्त वक्तव्य केले होते. मौर्य म्हणाले की, सरकारने अयोध्येत ढोंग चालवलं आहे. देशातल्या तरुणांची आणि नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सरकारने अयोध्येत रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा केली आहे. त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर ऐन निवडणुकीच्या वेळी गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : LokSabha 2024 : लोकशाही वाचवण्याची ही अखेरची संधी; निवडणुका जाहीर झाल्यावर काय म्हणाले खर्गे ?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -