Wednesday, October 4, 2023
घर मानिनी Religious Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना किती गाठी बांधणे शुभ असते?

Raksha Bandhan 2023 : भावाला राखी बांधताना किती गाठी बांधणे शुभ असते?

Subscribe

रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना नेमक्या किती गाठी बांधाव्यात आणि राखी बांधण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ आहे हे जाणून घेऊ.

रक्षाबंधनचा दिवस प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खूप विशेष असतो. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला रक्षाबंधन साजरी केली जाते. भाऊ आणि बहिणीच्या नात्याचं वेगळेपण सांगणारा हा सण प्रत्येक भाऊ-बहिणीसाठी खास असतो.  रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधताना नेमक्या किती गाठी बांधाव्यात आणि राखी बांधण्यासाठी कोणता मुहूर्त शुभ आहे हे जाणून घेऊ.

राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ 

The Raksha Bandhan (or Rakhi) Festival

- Advertisement -

 

धार्मिक मान्यतेनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधताना तीन गाठी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचबरोबर ब्रम्हा, विष्णू, महेश या त्रिमूर्तींना हिंदू धर्मात खूप महत्व आहे. त्यामुळे याच त्रिमूर्तींवरूनच रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधताना तीन गाठी बांधणे शुभ मानले जाते.

- Advertisement -

 

राखी बांधताना कोणत्या दिशेला बसावे?

Happy Raksha Bandhan 2022 Wishes: 20 Popular Rakhi Quotes, Messages, WhatsApp Status for Your Brother, Sister, and Siblings, Best Raksha Bandhan Quotes Here

शास्त्रानुसार, राखी बांधताना भावाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे. तर भावाची पाठ पश्चिम किंवा दक्षिणेकडे असावी. राखी बांधण्यापूर्वी भावाच्या डोक्यावर रूमाल किंवा टोपी जरूर ठेवा.

रक्षाबंधन शुभ मुहूर्त

या वर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच 30 ऑगस्टला दिवसभर भद्रा काळ असणार आहे. त्यामुळे 30 ऑगस्टला रात्री 9 नंतर ते 31 ऑगस्ट सकाळी 7 वाजेपर्यंत भावाला राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे.

 


हेही वाचा : Raksha Bandhan 2023 : भावासाठी अशा राख्या कधीही घेऊ नका

- Advertisment -

Manini