Eco friendly bappa Competition
घर क्राइम धक्कादायक: धनाच्या लोभापायी आईचा आपल्याच मुलीला जाळण्याचा प्रयत्न

धक्कादायक: धनाच्या लोभापायी आईचा आपल्याच मुलीला जाळण्याचा प्रयत्न

Subscribe

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे मायलेकरांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने धनाच्या लोभापायी मैत्रिणीच्या सांगण्यावरून आपल्या 20 वर्षांच्या पोटच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. जाळल्यानंतरही तिचा मृत्यू न झाल्यानं तिला घरातच 5 दिवस डांबून ठेवलं.

औरंगाबाद: मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे मायलेकरांच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका आईने धनाच्या लोभापायी मैत्रिणीच्या सांगण्यावरून आपल्या 20 वर्षांच्या पोटच्या मुलीला जाळण्याचा प्रयत्न केला. जाळल्यानंतरही तिचा मृत्यू न झाल्यानं तिला घरातच 5 दिवस डांबून ठेवलं. या प्रकरणावरून आरोपी आईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्वती दादासाहेब हुलमुख ( वय 40 वर्षे) असं आरोपी महिलेचं नाव असून, सुप्रिया दादासाहेब हुलमुख ( वय 20 वर्षे) असं जखमी मुलीचं नाव आहे. तर पार्वतीला मुलीला पेटवून दे, असं सांगणाऱ्या शकुंतला आहेरवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

सुप्रिया हुलमुखच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं, ती आपल्या आई व भावासह फुलेनगरमध्ये राहते. शिक्षणासोबतच एका खासगी कंपनीत कंत्राटी म्हणून ती काम करते. 17 ऑगस्ट रोजी दिवसभर कंपनीत काम करून ती घरी परतली. घरी आल्यावर जेवण करून सुप्रिया नेहमीप्रमाणे रात्री झोपी गेली. मात्र, पहाटे साडेचार वाजता तिला चटक्यांची जाणीव झाल्यानं ती खडबडून जागी झाली. तेव्हा तिचं पांघरूण जळत होतं. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची आईच तिला पेटवण्याचा प्रयत्न करत होती. तिची आरडाओरड ऐकून भावाने तिच्या दिशेने तत्काळ धाव घेतली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.

मिसारवाडी परिसरात राहणारी शकुंतला काळी जादू सांगत अनेकांना फसवण्याचे प्रकार करते. सुप्रियाची आई तिच्याकडे जाऊन जादूटोणा करायची. शकुंतला हिने पार्वतीला सांगितलं की, तू जर मुलीला जीवंत जाळून मारलंस, तर तुला धनलाभ होईल. तसंच, तुम्ही मुलाचं चांगलं होईल, असं शकुंतला आहेर हिने पार्वतीला सांगितलं होतं. त्यामुळे जादुटोण्याच्या आहारी गेलेल्या पार्वतीनं आपल्याच मुलीला झोपेत असतानाच पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात सुप्रिया सुदैवानं वाचली. त्यानंतर तिने हा सर्व प्रकार पोलिसांत सांगितला. सध्या याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

( हेही वाचा :Manish Jain : आम्हाला न्यायाची अपेक्षा; दोन दिवसांच्या ED चौकशीनंतर मनीष जैन यांची प्रतिक्रिया )

- Advertisment -