Wednesday, September 27, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Beauty चाळीशी पार केलेल्या महिलांसाठी अँटी एजिंग टीप्स

चाळीशी पार केलेल्या महिलांसाठी अँटी एजिंग टीप्स

Subscribe

जसेजसे आपण वयाच्या 40 मध्ये पाऊल ठेवतो तेव्हा आपल्या त्वचेत हार्मोनल आणि कोलेजन उत्पादनाच्या कमतरतेमुळे महत्त्वपूर्ण बदल होतात. मात्र स्किनची योग्य काळजी घेतल्यास आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे स्किन एजिंगची समस्या नियंत्रणात ठेवू शकतो. पुढील काही अँन्टी एजिंग टीप्सच्या तुमच्या नक्की कामी येतील. (Anti aging problem tips)

स्किन क्लिजिंगला प्राथमिकता
स्वच्छ, चमकदार त्वचा हवी असेल तर नियमित क्लीजिंग करा. हयालूरोनिक अॅसिड किंवा सेरामाइड्स असणारे प्रोडक्ट्स वापरा ज्यामुळे त्वचेवर ओलसरपणा राहिल.

- Advertisement -

एक्सफोलिएशन
आपल्या स्किननुसार स्क्रब निवडा. मात्र तो अधिक कठोर नसावा. स्क्रबमुळे डेड स्किन सेल्स दूर होतात आणि स्किनला ग्लो येतो.

मॉइश्चराइजर
वयाच्या चाळीशीत त्वचेवरील ओलसरपणा कमी होऊ लागतो. त्यामुळे त्वचेला मॉइश्चराइज करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे चेहरा धुतल्यानंतर आपल्या स्किनला मॉइश्चराज करणे विसरु नका.

- Advertisement -

हेल्दी लाइफस्टाइल
अँन्टी एजिंग रुटीनचा अर्थ असा होतो की, केवळ ब्युटी प्रोडक्ट्सपर्यंत मर्यादित राहत नाही. खुप पाणी प्या, संतुलित आहार घ्यावा, प्रोसेस्ड फूड पासून दूर रहावे आणि नियमित रुपात व्यायाम करावा.

पुरेशी झोप घ्या
त्वचा अशावेळी ग्लो करते जेव्हा आपला मेंदू आणि शरिर रिलॅक्स राहतो. त्यासाठी तणावापासून दूर रहा आणि दररोज कमीत कमी आठ तासांची पुरेशी झोप घेण्यास विसरु नका.

डोळ्यांची काळजी
वयाच्या चाळीशीपर्यंत सुरकुत्या आणि सूज येण्याचा धोका असतो. यापासून दूर राहण्यासाठी पेप्टाइड्स, हायलुरोनिक अॅसिड आणि अँन्टीऑक्सिडेंटयुक्त आय क्रिम किंवा सीरमचा वापर करू शकता.

उन्हापासून दूर रहा
वेळेआधी अँन्टी एजिंगच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी स्किनला हानिकारक युवी किरणांपासून दूर ठेवणे अत्यंत गरजेचे असते. कमीत कमी 50 SPF असणारे ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रिन घराबाहेर पडण्यापूर्वी जरुर लावा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे वय वाढणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे नाराज होण्याऐवजी अॅक्टिव्ह राहून, आनंदित राहून आणि हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करून तुम्ही आयुष्याची मजा घेऊ शकता.


हेही वाचा- Dark circle ने त्रस्त आहात मग करा ‘हे’ उपाय

- Advertisment -

Manini