घरक्राइम"कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न करतंय" भाजप आमदार प्रसाद लाड यांचे सरकारला पत्र

“कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न करतंय” भाजप आमदार प्रसाद लाड यांचे सरकारला पत्र

Subscribe

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्याला कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पत्राच्या माध्यमातून दिली आहे. प्रसाद लाड यांनी जीवाला धोका असल्याचे पत्र राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला लिहिले आहे.

मुंबई : भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्याला कोणीतरी जीवे मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पत्राच्या माध्यमातून दिली आहे. प्रसाद लाड यांनी जीवाला धोका असल्याचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पाठवले. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारला आणि पोलीस प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात अनिल गायकवाड नामक व्यक्तीचा उल्लेख केला असून या व्यक्तीपासून जीवाला धोका असल्याचे लाड यांच्याकडून पत्रात नलूद करण्यात आले आहे. (MLC Prasad Lad sent a letter to government and police administration saying that there is a threat to life)

हेही वाचा – शेतकऱ्यांना पाठ दाखवून कुठे पळाले? राज्य आणि केंद्र सरकारवर ठाकरे गटाचे टीकास्त्र

- Advertisement -

प्रसाद लाड हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत. तसेच त्यांची क्रिस्टल नावाची कंपनी आहे. या व्यतिरिक्त लाड हे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देखील मानले जातात. त्यामुळे खुद्द गृहमंत्र्यांच्या निकट असलेल्या प्रसाद लाड यांना जीवाचा धोका निर्माण होणे, ही गंभीर बाब असल्याचे बोलले जात आहे.

काय लिहिले आहे पत्रात?

“मला प्राप्त झालेल्या पत्रानुसार या पत्रात राहुल कंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड नामक व्यक्तीकडून मला जीवे मारण्याबाबत विविध मार्गांचा अवलंब करत प्रयत्न करत असल्याबाबत या पत्रात उल्लेख असुन याबाबत राहुल
कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी खार पोलीस स्टेशनला याची रितसर कल्पना दिली होती. त्याचबरोबर यांनी गायकवाड नामक व्यक्तीने जितेंद्र कांबळे व त्याचे दोन सहकारी यांना दगडी चाळ व तसेच चेंबूर येथे घेऊन गेल्याचे पत्रात नमूद केलेले आहे. त्याप्रमाणे जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल गायकवाड नामक व्यकती वरील नमूद दोन ठिकाणी घेऊन गेला होता. त्याप्रमाणे राहुल कंडागळे तसेच जितेंद्र कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गायकवाड व्यक्‍ती आहे का ? याचा तपास होणे आवश्यक आहे. व राहुल कंडागळे यांनी महिन्याभरापूर्वी माहिती दिलेली असताना सुध्दा यावर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही. त्याचप्रमाणे मागील आठवडयात माझ्यासह माझे सहकारी हे अमित पवार यांच्यावर अनोळख्या व्यक्तीकडून पाळत ठेवण्यात येत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. माझ्या राहत्या घराजवळ व ऑफीसजवळ एक अनोळखी व्यक्ती पाळत ठेवत असल्याचे मला जाणवले आहे. या सर्व घटनांबाबत सोबत जोडलेल्या पत्रांच्या माध्यमातुन रितसर माहिती देण्यात आलेली आहे. यातील एक विषय श्रमिक उत्कर्ष सभा या युनियनच्या संबंधित असून तसेच दुसरा विषय हा माझ्या व्यवसायाशी संबंधित आहे.

तरी मी एक लोकप्रतिनिधी या नात्याने विविध क्षेत्राशी संबंध येत असतो. याबाबतचे निवेदन मागील आठवडयात सह आयुक्त गुन्हे ब कायदा सुव्यवस्था यांना दिली होती. तरी वरील दोन्ही विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन तातडीने दखल घेण्यात
यावी. व आपणांकडून उचित कारवाई करण्यात येईल अशी मी अपेक्षा बाळगतो.
धन्यवाद !

सोबत : अनिल गायकवाड नामक व्यक्तीचे छायाचित्र पत्रासोबत जोडत आहे.”

गेल्या काही महिन्यात राजकारण्यांना जीवे मारण्याच्या धमक्यांमध्ये वाढ झाली आहे. शरद पवार, संजय राऊत, खासदार नवनीत राणा यांच्यासह अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत. परंतु आता तर फडणवीसांच्या मर्जीतील आणि निकट असलेल्या आमदारालाच जीवे मारण्याची भीती सतावत असल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी कोणती कारवाई करण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -