Monday, May 29, 2023
घर मानिनी Health Arthritis Awareness Month: कुटुंबात असेल जर अर्थराईटीस हिस्ट्री तर घ्या काळजी

Arthritis Awareness Month: कुटुंबात असेल जर अर्थराईटीस हिस्ट्री तर घ्या काळजी

Subscribe

बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्यामुळे अर्थराइटिसची समस्या निर्माण होते. यामुळे हाडांना सूज येणे, सांधे दुखण्याची समस्या सुरु होऊ शकतो. सांधे मजबूत ठेवण्यासाठी आपण बालपणापासून आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिले पाहिजे. जेवणात विटामिनच्या कतमरतेमुळे हाडं आणि कार्टिलेजवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळेच आर्थराइटिस सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी जागृक राहिले पाहिजे.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनुसार, आर्थराइटिस संबंधित 100 पेक्षा अधिक रुपात असू शकतात. परंतु हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे की, मोठ्यांसह लहानांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. आर्थराइटिसच्या प्रति लोकांना जागृक करण्यासाठी प्रत्येक वर्षी मे महिन्यात आर्थराइटिस अवेरयनेस मंथ साजरा केला जातो.

- Advertisement -

विटामिन्स ठरतात फायदेशीर
विटामिन डी आणि विटामिन के हे हाडांना बळकटी देतात. विटामिन के चा कार्टिलेज कम्पोजिशनमध्ये समावेश असतो. या दोघांची कमतरता असल्यास विटामिन सप्लिमेंट्स सुद्धा खाऊ शकतो. पण याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

विटामिन बी 12 चे योगदान
विटामिन बी 12 च्या कमतरतेमुळे हाडांवर प्रभाव पडू शकतो. एकूणच हेल्दी आरोग्यासाठी याच्या सप्लीमेंटला आयुष्यातील अनिवार्य हिस्सा बनवले पाहिजे. ज्या लोकांनी ऑटोइम्युन आजार जसे की, रुमेटीइड अर्थराइटिस आहे. तर यामुळे पेन मॅनेजमेंट आणि भविष्यातील आरोग्याच्या जोखिम रोखण्यास मदत करु शकते.

- Advertisement -

माश्याचे तेल
फिश ऑळ मध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. यामध्ये अँन्टी इंफ्लेमेंटरी गुण असतात. ओमेगा-3 फॅट ऑस्टियोआर्थराइटिसच्या तुलनेत रुमेटीइड गाठींसाठी उत्तम काम करतो. ओमेगा-3 सप्लीमेंट सांधे दुखी, सूज कमी करु शकते. अळशी सारख्या प्लांट बेस्ड फूडमध्ये सुद्धा ओमेगा-3 असते. ते शॉर्ट-टेन अल्फा-लिनोलेनिक अॅसिडच्या रुपात असते.शाकाहरी लोक प्लांट बेस्ड फूड सप्लीमेंट घेऊ शकतात.

काळीमिरी
काही नैसर्गिक सप्लीमेंट मध्ये काळीमिरीचा अर्क पिपेरिन मिसळला जातो. हा विटामिनच्या अवशोषणाला प्रोत्साहन देतो. त्यामुळे हाडांना फार फायदा होतो.


हेही वाचा- ‘या’ संकेतावरुन कळते तुम्ही Overeating करताय

- Advertisment -

Manini