Monday, May 6, 2024
घरमानिनीHealthआर्टिफिशियल साखरेमुळे वाढू शकतो Liver Cancer चा धोका

आर्टिफिशियल साखरेमुळे वाढू शकतो Liver Cancer चा धोका

Subscribe

आपण शरिराला इंस्टेट उर्जा मिळावी म्हणून विविध प्रकारचे कार्बोनेटेड ड्रिंक घेतात. हेच ड्रिंक लहान मुलं ते वयस्कर व्यक्ती सुद्धा पितात. मात्र तुम्हाला माहितेय का, यामध्ये वापरला जाणारा नॉन-शुगर स्वीटरन एस्पार्टेम हा कॅन्सरसाठी कारणीभूत ठरू शकतो. डब्लूएचओने यावर आणखी दोन रिसर्च सेंटर सोबत संशोधन केले. या शोधाचे निष्कर्ष असे सांगतात की, गरजेपेक्षा अधिक एस्पार्टेमचे सेवन केल्यास तर व्यक्तीमध्ये कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

रिसर्चमध्ये काय आहे?
डब्लूचओने निकायो इंटरनॅशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि एफएओ सोबत मिळून नॉन शुगर स्वीटनर एस्पार्टेममुळे आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो याचे आकलन केले. या संघटनांच्या आकलन निष्कर्षानुसार, एस्पार्टेमला संभाव्यत: व्यक्तीला IARC Group 2B च्या रुपात वर्गीकृत करण्यात आले.

- Advertisement -

याच्यानुसार 70 किलोचा एखादा व्यक्ती मर्यापेक्षा अधिक म्हणजेच प्रतिदिन एस्पार्टेम युक्त 9-14 पेक्षा अधिक डब्ब्यांचे पीत असेल तर त्याच्यामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. जेईसीएफएनुसार एखादा व्यक्तीने प्रतिदीन याचे मर्यादित सेवन करावे. एस्पार्टेम हा व्यक्तीत लिवर कॅन्सर विशेष रुपात हेपेटोसेलुलर कार्सिनोमासाठी जबाबदार असू शकतो.

- Advertisement -

एस्पार्टेम म्हणजे काय?
एस्पार्टेम एक आर्टिफिशियल स्वीटनर आहे. याचा वापर 1980 च्या दशकात विविध खाद्य आणि पेयांच्या प्रोडक्ट्समध्ये वापर केला जात होता. एस्पार्टेमचा वापर डाएट कोक, पेप्सी जीरो शुगर आणि अन्य डाएट सोडा ड्रिंकमध्ये केला जातो. या व्यतिरिक्त च्युइंग गम, जिलेटिन, आइस्क्रिम, डेयरी प्रोडक्ट्स जसे की, दही, प्रीजर्वेटिव असणारे ब्रेकफास्ट, टूथपेस्ट आणि कफ सिरपमध्ये असते.

लिवर कॅन्सरची शक्यता
डब्लूएचओने सोडा स्वीटनर एस्पार्टेमला कॅन्सर होण्याचे एक संभाव्य कारण असल्याचे म्हटले आहे. संघटनेचे निष्कर्ष असे सांगतात की, जर त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात केले तर धोका नाही.


हेही वाचा- लिव्हरसाठी दारू पेक्षाही धोकादायक आहेत हे पदार्थ

- Advertisment -

Manini