Sunday, February 25, 2024
घरमानिनीKitchenCorn Recipes : नाश्त्यासाठी बनवा हेल्दी कॉर्न उपमा

Corn Recipes : नाश्त्यासाठी बनवा हेल्दी कॉर्न उपमा

Subscribe

उपमा हा झटपट होणारा पदार्थ आहे. अशातच आपण सर्वानी रव्याचा उपमा हा खाल्ला असेलच पण कॉर्नचा उपमा तुम्ही कधी खाल्ला नसेल तर आता नक्की ट्राय करा. हेल्दी कॉर्न उपमा बनविण्यासाठी जाणून घ्या साहित्य आणि कृती…

साहित्य

 • एक वाटी स्वीट कॉर्न.
 • दोन बारीक चिरलेले कांदे.
 • एक चमचा तेल, जिरे, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, मोहरी, हळद, लाल तिखट.
 • चवीनुसार मीठ.
 • शेंगदाणे आवश्यक आहे.
 • ताजी चिरलेली कोथिंबीर.
 • किसलेले खोबरे.

Sweet Corn Upma, makai rava uppittu made using with or without semolina , healthy Indian breakfast 16283465 Stock Photo at Vecteezy

कृती

 • उपमा बनवण्यासाठी एक कप स्वीट कॉर्नमध्ये पाणी घालून बारीक वाटून घ्या.
 • आता कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग आणि मोहरी टाकून तडतडू द्या.
 • ते चांगले तडतडल्यावर आता त्यात चिरलेली हिरवी मिरची, किसलेले आले, कढीपत्ता आणि कांदा घालून परतून घ्या.
 • कांदा परतून झाल्यावर त्यात हळद, मीठ आणि बारीक वाटलेले कणीस घालून शिजू द्या.
 • आता दुसऱ्या बाजूला एका पातेल्यात शेंगदाणे टाकून चांगले भाजून घ्या. भाजल्यावर त्याची साल काढून बारीक वाटून घ्या.
 • आता कॉर्न बरोबर ग्राउंड शेंगदाणे घाला. त्यात किसलेले खोबरे घाला,लिंबाचा रस घाला.
 • सर्व काही घातल्यावर झाकून ठेवा आणि थोडा वेळ शिजू द्या.आता त्यात चिरलेली कोथिंबीर घाला.

________________________________________________________________________

हेही वाचा :

अनेक समस्यांवर ‘मका’ आहे रामबाण उपाय

- Advertisment -

Manini