Friday, April 19, 2024
घरमानिनीPeriods मधील दुर्गंधी कशी घालवाल

Periods मधील दुर्गंधी कशी घालवाल

Subscribe

मासिक पाळी दरम्यान दुर्गंधी येण्याच्या समस्येला काही महिलांना सामोरे जावे लागते. परंतु तुम्ही यामागील कारण जाणून घेण्याचा कधी प्रयत्न केला आहे का? मासिक पाळीच्या दरम्यान दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी काही टीप्स जरुर फॉलो केल्या पाहिजेत.

-स्वच्छ अंडरवियर

- Advertisement -


मासिक पाळीदरम्यान, स्वच्छ अंडरवियर घाला. काही वेळेस असे होते की, अंडरवियरवर रक्ताचा डाग लागतो आणि ती व्यवस्थितीत धुतली न गेल्यास त्याचा काही अंश त्यावरच राहतो आणि तिच पँन्टी आपण घालतो. पण असे करण्यापासून दूर रहा.

-मेंस्ट्रुअल कप

- Advertisement -


मासिक पाळीदरम्यान दुर्गंधी येण्यापासून दूर राहण्यासाठी सर्वात सोप्पी पद्धत मेंस्ट्रुअल कपचा वापर करा. याचा वापर केल्याने तुम्ही दुर्गंधी येण्याच्या समस्येपासून दूर राहू शकता.

-सेंटेड पॅड


सेंटेड पॅडच्या कारणास्तव अधिक दुर्गंधी येते. यामुळेच नॉन-सेंटेंड पॅडचा वापर करा.

-बेबी वाइप्स


मासिक पाळीदरम्यान अधिक स्वच्छता बाळगण्यासाठी आणि दुर्गंधीपासून दूर राहण्याकरिता बेबी वाइप्सचा वापर करा.

-पॅड बदला


मासिक पाळीदरम्यान वेळोवेळी तुमचा पॅड बदलावा. एकच पॅड दीर्घकाळापर्यंत घालून ठेवू नका. यामुळे दुर्गंधी येऊ शकते.

-दररोज अंघोळ करा


मासिक पाळीदरम्यान, दररोज अंघोळ करा, असा प्रयत्न करा की, दिवसातून दोन वेळा तरीही अंघोळ करा.

दरम्यान, मासिक पाळीदरम्यान कॉटनची अंडरवियर घालावी. जेणेकरुन हवा व्यवस्थितीत तेथे पास होईल. जर घाम आला तर तेथून दुर्गंधी येऊ शकते.

- Advertisment -

Manini