Friday, April 26, 2024
घरमानिनीHealthसावधान‍! किडनीसाठी 'हे' पाच पदार्थ आहेत घातक

सावधान‍! किडनीसाठी ‘हे’ पाच पदार्थ आहेत घातक

Subscribe

मानवी शरीरातील किडनी शरीरातील सर्वात महत्वाचा भाग आहे. किडनी आपल्या शरीरातील रक्त साफ करते. त्यामुळे शरीरातील किडनीची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. अनेकदा उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे किडनीचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. किडनीच्या आजाराला चार विविध भागांमध्ये वाटलं जातं. ज्यामध्ये किडनी स्टोन, अॅक्यूट किडनी एंज्यूरी, क्रोनिक किडनी डिजीज, इंड स्टेज रीनल डिजीज हे सहभागी आहेत. मात्र, यांसारख्या आजारांपासून स्वतःला वाचवण्यासाठी काही विविध पदार्थांचे सेवण करणे तुम्हाला टाळायला हवे.

तुमच्या किडनीसाठी ‘हे’ पाच पदार्थ आहेत घातक

- Advertisement -

वारंवार पिझ्झा खाल्ल्याने किडनीला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. कारण यामध्ये व्हाइट ब्रेड क्रस्ट आणि टोमॅटो सॉसचे प्रमाण जास्त असते.

- Advertisement -

भारतामध्ये बटाट्याचे सेवण मोठ्या प्रमाणात केले जाते. बटाट्यापासून अनेक फास्ड फूड देखील तयार केले जातात. यामध्ये पोटॅशियम आणि सोडियम मोठ्या प्रमाणात असते. जे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.


पॅकेट बंद मिळणाऱ्या चिकन किंवा मटणामध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे रक्तदाब वाढू लागतो. ज्याचा किडनीवर देखील वाईट परिणाम पाहायला मिळतो.


सूप प्यायला सगळ्यांना आवडते. मात्र, बाजारातील सूपमध्ये मीठाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे त्याचा वाईट परिणाम किडनीवर होऊ शकतो.

सोया सॉसमध्ये देखील सोडियम मोठ्या प्रमाणात आढळते. एक चमचा सोया सॉसमध्ये 950 मिलीग्राम सोडियम असते. यामुळे पदार्थ रुचकर लागतात. परंतु हे किडनीसाठी खूप घातक आहे.

 


हेही वाचा : 

जेवणावर फुंकर मारणं बाळासाठी धोक्याचं

- Advertisment -

Manini