Monday, April 29, 2024
घरमानिनीHealthब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी खावे चॉकलेट

ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी खावे चॉकलेट

Subscribe

चॉकलेट सर्वजण आवडीने खातात. आपण एखाद्या गिफ्ट देताना सुद्धा स्विट्समध्ये चॉकलेटचा पर्याय ही बहुतांशवेळा निवडतो. ऐवढेच नव्हे तर जेव्हा तुमचा मूड ऑफ असतो तेव्हा बहुतांश लोक तुम्हाला चॉकलेट खाण्याचा सल्ला देतात. प्रेम व्यक्त करताना सुद्धा चॉकलेटची कॅडबरी तर दिलीच जाते. मात्र तुम्हाला चॉकलेट खाल्ल्याने त्याचे आरोग्याला होणारे फायदे माहितेयत का? (chocolate help to control blood pressure)

मूड बूस्ट होतो
काही खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने सेरोटोनिनचा स्तर वाढला जातो. बहुतांश लोक आरोग्याच्या कारणास्तव याच्या उपचारापासून दूर राहतात. मात्र ही एक चुकीची धारणा आहे. ज्या लोकांना डार्क चॉकलेटचे सेवन करायचे असते त्यांच्यामध्ये नैराश्याची लक्षण चॉकलेच न खाणाऱ्यांच्या तुलनेत कमी दिसतात.

- Advertisement -

सेरोटोनिन आणि एंडोर्फिन वाढवते डार्क चॉकलेट
कोणतीही गोष्ट मर्यादेपेक्षा अधिक खाल्ली की ती आरोग्यासाठी समस्या उद्भवते. हिच गोष्ट चॉकलेटच्या बाबतीत ही लागू होते. केवळ कमी प्रमाणात डार्क चॉकलेट तुम्हाला फ्रेश ठेवण्यास मदत करते. हाय कोको असणाऱ्या डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन असते. डार्क चॉकलेट आपल्या शरिरातील सेरोटोनिनचा स्तर वाढवून आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेतो.

लो ब्लड प्रेशरवेळी खा डार्क चॉकलेट
70 टक्के कोको असणारे डार्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात अँन्टीऑक्सिडेंट, पॉलीफेनोल्स आणि फ्लेवोनोइड्स असातात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे मानले जाते. ते वासोडिलेशनचे कारण असतात जे, रक्तवाहिन्यांना आराम पोहचवतात आणि ब्लड सर्कुलेशनमध्ये सुधार करतात. त्याचसोबत चॉकलेट आणि कोकोमध्ये थियोब्रोमाइन असते. जे ब्लड प्रेशरला संतुलित ठेवतात आणि तुमचे हृदयाचे आरोग्य ही हेल्दी राहतो.

- Advertisement -

मधुमेहासाठी फायदेशीर चॉकलेट
मधुमेह असलेल्या रुग्णांनी चॉकलेटचे सेवन करावे. डॉक्टरांच्या मते, डार्क चॉकलेट फास्टिंग ग्लुकोजचा स्तर कमी करण्यास आणि इंसुलिनचा प्रतिकार कमी करण्यास ही मदत करते. मात्र मधुमेह असलेल्या रुग्णांनी अधिक प्रमाणात चॉकलेटचे सेवन करु नये.

कोणते चॉकलेट आरोग्यासाठी बेस्ट
ऐडेड शुगर युक्त आणि फ्लेवर्ड चॉकलेटचे सेवन करु नका. अशातच अँन्टिऑक्सिडेंट,पॉलीफेनॉल युक्त डार्क चॉकलेट खाणे आरोग्यासाठी योग्य असेल. 70 टक्के कोको युक्त डार्क चॉकलेट निवडा. याचे सेवनाने काही फायदे होऊ शकतात. ब्लड प्रेशर संतुलित राहण्यासह कोलोस्ट्रॉलचा स्तर ही सामान्य राहू शकतो. तसेच तुमचा मूड ही बूस्ट होतो.


हेही वाचा- जेवल्यानंतर आईस्क्रिम खाणं ठरू शकतं घातक

- Advertisment -

Manini