घरदेश-विदेशManipur Violence : भाजप आमदाराचाच पंतप्रधानावर हल्ला बोल; म्हणाले, 'ही शांतता बधीर...

Manipur Violence : भाजप आमदाराचाच पंतप्रधानावर हल्ला बोल; म्हणाले, ‘ही शांतता बधीर करणारी’

Subscribe

मणिपूरमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार पाओलीनलाल हाओकिप यांनी मणिपूर हिंसाचारा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.

नवी दिल्ली ः मणिपूर हिंसाचाराचे पडसाद थेट संसदेत उमटले आहेत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी याच कारणावरुन विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी पहिल्या दिवशी संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले होते. मणिपूर हिंसाराचावर विरोधक पंतप्रधानावर ताशेरे ओढत असता चक्क सत्तेतील आमदारानेही आता पंतप्रधानाच्या कार्यशैलीवर बोट ठेवत भाजपाला घरचाच अहेर दिला आहे.

मणिपूरमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार पाओलीनलाल हाओकिप यांनी मणिपूर हिंसाचारा संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, मणिपूर हिंसाचारावर मौन सोडविण्यासाठी एक व्हिडीओ व्हायरल व्हावा लागला हे खूप दुर्दैवी आहे. अशाप्रकारचा हिंसाचार होत असेल तर 79 दिवसांचा उशीर तर सोडाच, पण एखादा आठवडा उशीर होणे हाही खूप मोठा काळ आहे. ही शांतता बधिर करणारी आहे असे म्हणत आमदार पाओलीनलाल हाओकिप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर सोडले मौन
मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करण्यात आलं आणि धिंड काढत सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया आल्या. इतकंच नाही, तर सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या व्हिडीओची दखल घेत प्रतिक्रिया दिली. यानंतर विरोधकांनी आरोप केला की, मणिपूरमध्ये दोन महिन्यांपेक्षा अधिक हिंसाचार होत असताना मोदी गप्प होते. सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर मोदींनी मौन सोडले.

अमेरिका दौऱ्याआधी वेळ दिली नाही
भाजप आमदार पाओलीनलाल हाओकिप हे कुकी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्या आधी कुकी समाजाने मणिपूरमध्ये घडत असलेल्या परिस्थिती संदर्भात काही तरी मार्ग निघावा म्हणून पंतप्रधानाची वेळ मागितली होती. मात्र, तेव्हा पंतप्रधानांनी वेळ दिली नाही. आजही आम्ही वेळ मिळण्याची वाट पाहत असल्याचे आमदार पाओलीनलाल हाओकिप यांनी एका खासगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगतिले.

- Advertisement -

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यावर साधला निशाणा
पाओलीनलाल हाओकिप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींपाठोपाठच मणिपूरचे मुख्यमंत्री हेच सर्वस्वी जबाबदार असल्याचाही आरोप पाओलीनलाल हाओकिप यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर आम्हाला राज्य सरकारकडून न्यायायाची कोणतीही अपेक्षा नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.

एक नव्हे तर व्हायरल व्हिडीओच्या चार घटना
पाओलीनलाल हाओकिप यांनी दिलेल्या माहितीनुसार, जो व्हिडीओ व्हायरला झाला त्यातील घटनेसारख्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेण्यासाठी विरेनसिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्हिडीओची आवश्यकता आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला. तर कुकी समाजातील 10 आमदारांनी आतापर्यंत मुख्यमंत्र्याविरुद्ध भाष्य केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -