घरमहाराष्ट्रJayant Patil : "प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रीपदही द्यायचे नव्हते", प्रकाश सोळंकेचा आरोप

Jayant Patil : “प्रदेशाध्यक्ष आणि मंत्रीपदही द्यायचे नव्हते”, प्रकाश सोळंकेचा आरोप

Subscribe

तीन पक्षांचे सरकार आणि मंत्रीपदे कमी आहेत. अजित पवारांनी सर्व जातीयधर्मीयांना न्याय देत आहेत. यामुळे मला मंत्री पद देऊ शकत नाही, असे प्रकाश सोळंके म्हणाले.

मुंबई : अजित पवार गटने कर्जत येथे दोन दिवसीय मंथन शिबिर आयोजित करण्यात येते. या शिबिरात अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार यांच्यावर हल्लाबोल केला. जयंत पाटील यांनी प्रकाश सोळंकेंना कार्याध्यक्ष पदाचा शब्द दिला. पण जयंत पाटील यांनी त्यावेळी दिलेला शब्द पाळला नाही, असा अजित पवारांनी केला गौप्यस्फोट केला होता. मला पक्षाने सांगितले असते तर मी राजीनामा दिला असता, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर दिली आहे. या प्रकरणी खुद प्रकाश सोळंकेंनी पहिली प्रतिक्रिया देत जयंत पाटलांवर टीका केली आहे.

जयंत पाटील यांनी शब्द न बाळल्यासंदर्भात प्रकाश सोळंके म्हणाले, “जयंत पाटील हे स्पष्ट खोटे बोलतात असून त्यांनी स्वत: मला शब्द दिला होता. त्यावेळी जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री देखील होते. तेव्हा जयंत पाटील यांच्याकडे मोठे खाते असल्याने त्यांनी तिकडे लक्ष देणे गरजेचे होते. पण दुसऱ्याला मंत्री होऊ द्याचे नाही अन् प्रदेशाध्यक्ष पदही कोणाला द्याचे नाही. दोन्ही महत्वाची पदे स्वत:कडे ठेवायची होती आणि ही पदे तुमच्याकडे कशाला हवी होती”, असा सवाल प्रकाश सोळंकेंनी जयंत पाटील यांना केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics of Baramati : सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवारांचे नाव चर्चेत; पण हाती घड्याळ की कमळ?

जयंत पाटील यांनी शब्द पाळला नाही

प्रकाश सोळंके म्हणाले, तुम्हाला जमले तर मला मंत्री पद द्या. नाही तर मला पर्यायी काम करण्याची संधी द्या. यानंतर तुमची एक वर्षासाठी तातडीने कार्याध्यक्ष पदाची निवड करतो. मग तुम्ही एक वर्ष अनुभव घेऊन प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे सांभाळा, असे अजित पवार आणि जयंत पाटील यांनी मला सांगितले होते. यासंदर्भात मी शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे सतत आठवण करून दिली असून देखील मला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. कार्यकर्त्यांवर कसा अन्याय होतो हेच अजित पवारांनी शिबिरात सांगितले.”

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha Election 2024: मोदीना पंतप्रधान करण्यासाठी प्रामाणिक राहावेच लागेल – हसन मुश्रीफ

मजा बघत बसायची जयंत पाटलांचा स्वभाव

मंत्री पद न देण्यासाठी प्रकाश सोळंके म्हणाले, तीन पक्षांचे सरकार आणि मंत्रीपदे कमी आहेत. अजित पवारांनी सर्व जातीयधर्मीयांना न्याय देत आहेत. यामुळे मला मंत्री पद देऊ शकत नाही, असे म्हटले होते. पण मी तेव्हा नाराज नव्हतो. मी पक्षा सोबतच आहे. मला जयंत पाटील यांच्या गणिताबद्दल विश्वास नाही. जयंत पाटील हे प्रश्न सोडवत नाही तर प्रलंबित ठेवायचे आणि त्यांची मजा बघत बसायची हा त्यांचा स्वभावच आहे, असाही आरोप प्रकाश सोळंकेंनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -