Sunday, December 3, 2023
घरमानिनीKitchenकुकिंगच्या 'या' चुकांमुळे पदार्थ होतात अनहेल्दी

कुकिंगच्या ‘या’ चुकांमुळे पदार्थ होतात अनहेल्दी

Subscribe

पदार्थ बनवताना काही सामान्य चुकांमुळे त्याची चव बदलली जाते आणि ते अनहेल्दी सुद्धा होतात. या व्यतिरिक्त पदार्थांमधील काही पोषक तत्वे ही कमी होतात. अशातच तुम्ही सुद्धा कुकिंग करताना पुढील काही चुका करत असाल तर तसे करण्यापासून दूर रहा.(Cooking tips)

-भाज्या आकारात न कापणे
जर तुम्ही भाज्या शिजवण्यासाठी त्या कापत असाल तर त्यांना समान आकारात कापाव्यात. काहीजण त्या समान आकारात कापत नाही त्यामुळे त्यामधील न्युट्रिएंट्स कमी होतात. अशातच काही भाज्या अधिक शिजल्या जातात तर काही व्यवस्थितीत शिजत सुद्धा नाहीत.

- Advertisement -

-पॅनमध्ये अधिक गोष्टी मिक्स करा
भाज्या बनवताना कधीकधी पॅनमध्ये खुप गोष्टी मिक्स करतो. अशातच फूड्स त्यांच्यामधील मॉइश्चर रिलीज करतात, त्यामुळे खाद्य पदार्थातील वॉटर सॉल्युबल, व्हिटॅमिन आणि मिनिरल्स कमी होतात. त्यामुळे कधीच जेवण बनवताना पॅनमध्ये एकाचवेळी अधिक गोष्टी मिक्स करू नका.

- Advertisement -

-काही भाज्या हलक्या उकळवून न घेणे
एक्सपर्ट्सनुसार, ब्रोकली आणि कोबी सारख्या भाज्या हलक्या उकळवून घेणे महत्त्वाचे असते. हलक्या उकळवून घेतल्यानंतर त्या बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवा. असे केल्याने याचा रंग आणि टेक्सचर तसाच राहतो. मात्र त्या भाज्या हलक्या उकळवून न घेतल्यास वॉटर सॉल्युबल, व्हिटॅमिन, मिनिरल्सची कमतरता निर्माण होऊ शकते. खासकरून व्हिटॅमिन सी आणि पोटॅशिअमची कमतरता.

-भाज्या शिजण्याची चुकीची पद्धत
जर भाज्या शिजवण्यासाठी तुम्ही चुकीची पद्धत वापरत असाल तर त्या अधिक शिजल्या जातात. अथवा शिजत सुद्धा नाहीत. तुम्ही भाज्या खुप वेळ उकळवून घेत असाल तर वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन जसे की, व्हिटॅमिन सी कमी होते. सर्व भाज्या शिजवण्याचे काही प्रकार असतात त्यामुळे त्याची चव आणि पोषण तत्त्व कायम टिकून राहतात.

-चुकीच्या तापमानाला खाद्य पदार्थ शिजवणे
विविध भाज्या आणि खाद्य पदार्थ शिजवण्यासाठी विविध तापमानाची गरज असते. उदाहरणासाठी फरसबी शिजवण्यासाठी हाय हिटची आवश्यकता असते. तर पदार्थ कोणत्या तापमानाला शिजवावेत हे माहिती पाहिजे.


हेही वाचा- तुम्ही भेसळ असलेल्या पीठाची पोळी तर खातं नाही ना ? असं ओळखा

- Advertisment -

Manini