Monday, April 29, 2024
घरमानिनीKitchenKitchen Tips : झटपट किचन टिप्स

Kitchen Tips : झटपट किचन टिप्स

Subscribe

अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशावेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो.

Cook Smarter, Not Harder: Nine Time-Saving Cooking Tips – Ask an Expert | USU

- Advertisement -
  • भाजीत मटारचे दाणे हिरवेगार दिसण्यासाठी त्यात साखर आणि मीठ घालून वाफवून घ्यावेत. मटार हिरवेगार राहण्यास मदत होते.
  • इडली मऊ होण्यासाठी इडलीच्या मिश्रणात थोडेसे खोबऱ्याचे तेल घालावे.
  • लसूण सोल्यानंतर बऱ्याचदा हाताला लसणाची दुर्गंधी येते. ती दुर्गंधी घालवण्यासाठी लिंबाचा तुकडा चोळा.
  • कोबीची भाजी बनवताना त्यात ब्रेडचा तुकडा टाकल्याने कोबीचा उग्र वास निघून जाण्यास मदत होते.
  • कांदा लवकर परतावा यासाठी त्यात चिमूटभर साखर घालावी. यामुळे कांदा लवकर परतला जातो.

The secrets of healthy home cooking | Live Better

  • मटण शिजवताना बऱ्याचदा ते शिजले शिजत नाही. अशावेळी मटण शिजवताना त्यात कच्च्या पपईची पेस्ट टाकल्याने मटण लवकर शिजते आणि मऊ देखील होण्यास मदत होते.
  • भाजीत फ्लॉवरचा रंग पाढंरा दिसण्यासाठी त्यात एक चमचा कणीक घालावी.
  • बटाटे किंवा अंडी उकडताना त्यात थोडेसे मीठ घातल्याने ते तुटत नाही. त्यासोबतच चव देखील चांगली लागते.
  • टोमॅटो, मुळा, बीट किंवा गाजर टवटवीत दिसण्यासाठी मिठाच्या पाण्यात रात्रभर ठेवावे.
  • शेंगदाणे मिनिटभर उकळत्या पाण्यात काढल्याने भाजल्यानंतर शेंगदाणे खमंग होतात.

हेही वाचा :

लोणचे वर्षभर टिकवण्यासाठी सोप्या टिप्स करा ट्राय

- Advertisment -

Manini