घरमहाराष्ट्रHari Narke Passed Away: ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन

Hari Narke Passed Away: ज्येष्ठ विचारवंत, लेखक प्रा. हरी नरके यांचे निधन

Subscribe

मुंबई | ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एशिअन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये वयाच्या 70 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हरी नरके यांना हृदयविकाराचा झटका आला होता. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. थोड्याच वेळात छगन भुजबळ रुग्णालयात दाखल होणार आहेत.

हरी नरके हे महात्मा फुले साहित्याचा अभ्यास आणि संशोधन, व्याख्याते म्हणून परिचित होते. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे ते अध्यासन प्राध्यापक होते. हरी नरके यांची ‘महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन’ आणि ‘महात्मा फुले – शोधाच्या नव्या वाटा’ या दोन पुस्तके प्रसिद्ध आहेत.हरी नरके यांनी अभिजात मराठी, आरक्षण, ओबीसी जनगणना, मराठा आरक्षण, शिक्षण, समाजशोध आदी विविध विषयांवरही विपुल लेखन केले आहे. हरी नरकेंनी आतापर्यंत 54 पुस्तकांचे लेखन आणि संपादन केले आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत प्रा. हरी नरके यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये म्हणाले,“ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड असा विचारवंत आपण गमावला आहे.”

- Advertisement -

हरी नरकेंचे निधन ही महाराष्ट्राच्या साहित्यिक, सामाजिक, परिवर्तनवादी चळवळीची हानी आहे, या शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हरी नरकेंच्या निधनानंतर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली. रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “ज्येष्ठ विचारवंत, लेखक आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो व नरके कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! ”

हेही वाचा – … मग आडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखले का? संजय राऊतांचा सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -