कपाळावर टिकली लावणाऱ्या महिला सुंदर दिसतातच. पण त्यांचे सौंदर्य यामध्ये अधिक उजळून ही दिसत. अशातच तुम्ही कधी विविध प्रकारची टिकली कपाळाला लावली आहे का? किंवा टिकली लावण्याचे काही हटके पर्याय तुम्हाला सुचलेत का? नाही, तर आज आम्ही तुम्हाला याच बद्दल सांगणार आहोत.
-चंद्रकोर टिकली
नेहमीच गोलाकार टिकली ऐवजी काहीतरी वेगळे ट्राय करण्यासाठी तुम्ही चंद्रकोर टिकली लावू शकता. अशा प्रकारची टिकली पारंपरिक साज जेव्हा तुम्ही करता तेव्हा लावल्यानंतर फार सुंदर दिसते. तुम्ही ही टिकली मेकअप ब्रशने सुद्धा करु शकता. अशा प्रकारची टिकली खासकरुन महाराष्ट्रीयन महिला लावतात.
-साडीसोबत चंदनाची टिकली
साडी नेसल्यानंतर चंदनाी टिकली काढणे हा उत्तम ऑप्शन ठरु शकतो. अशा प्रकारची टिकली अत्यंत क्रिएटिव्ह असते. पण तुम्ही ती दररोज लावू शकत नाही. एखाद्या खास कार्यक्रमावेळी खास लूक येण्यासाठी तुम्ही अशा प्रकारची टिकली लावू शकता. ही टिकली खासकरुन बंगाली लोकांमध्ये लावली जाते.
-काही हटके ट्राय करा
टियर ड्रॉप टिकलीचा ऑप्शन तुमच्यासाठी उत्तम ठरेल. याचे काही ऑप्शन ही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आउटफिट आणि पसंदीनुसार टिकली निवडू शकता.
-अशा प्रकारची टिकली तुमचे सौंदर्य खुलवते
सर्वसामान्यपणे महिला विविध रंगाची टिकली लावली जाते. मात्र स्टोन असणारी टिकली थोडी वेगळी आणि चकचकीत असते. कॉलेजला जाणाऱ्या तरुणी ते दररोज सुद्धा तुम्ही अशा प्रकारची लहान आकाराची टिकली लावू शकता.
हेही वाचा: लग्नानंतर महिला नथ का घालतात? ‘हे’ आहे धार्मिक कारण