Saturday, May 11, 2024
घरमानिनीRecipeDiwali 2023 : अशा तयार करा खुसखुशीत करंज्या

Diwali 2023 : अशा तयार करा खुसखुशीत करंज्या

Subscribe

दिवाळी फराळ्याच्या स्पेशल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत. यावर्षीही दिवाळीचा फराळ घरीच करा.  दिवाळीच्या फराळामधला महत्त्वाचा पदार्थ म्हणजे करंज्या. ओल्या नारळाच्या करंज्या, सुक्या खोबऱ्याच्या करंज्या बनवल्या जातात.

साहित्य :

  • मैदा
  • रवा
  • तूप
  • मीठ
  • किसलेलं खोबरं
  • खसखस
  • काजू
  • बदाम
  • वेलची पूड
  • चारोळ्या

कृती :

Maharashtrian Karanji Recipe (Gujiya) - A Delicious Diwali Sweet by Archana's Kitchen

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम मैदा बारिक चाळून घ्या नंतर पिठात दूध मिक्स करा आणि पिठ छान मळून घ्या.
  • आता दुसरीकडे करंजीच्या आतील सारण तयार करण्यासाठी किसलेलं सुकं खोबर,काजू, बदाम,चारोळ्या हलक्याश्या भाजून घ्या.
  • आता त्यात आवडीप्रमाणे पिठी साखर घाला आवडीनुसार वेलची पुड घाला.
  • मैद्याच्या पिठाचे छोटे छोटो गोळे बनवा आणि ते पातळ लाटून त्याच्या लाट्या तयार करून घ्या.
  • त्यात मध्यभागी तयार केलेलं सारण भरा आणि करंजीच्या एका बाजूला पाणी किंवा दूध लावा त्या बाजूला दुसरी बाजू चिकटवा.
  • दोन्ही बाजू व्यवस्थित चिकटवून घ्या.
  • त्यानंतर सुरी किंवा चरकीने जास्तीच्या कडा कापून घ्या.
  • करंज्या तेलात किंवा तुपात मंद आचेवर सोनेरी रंगावर छान तळून घ्या.

हेही वाचा :

Diwali 2023 : घरच्या घरी तयार करा कुरकुरीत भाजणीची चकली

- Advertisment -

Manini