Saturday, December 9, 2023
घरमानिनीKitchenदिवाळीत उरल्या सुरल्या मिठाईपासून बनवा टेस्टी 'खीर'

दिवाळीत उरल्या सुरल्या मिठाईपासून बनवा टेस्टी ‘खीर’

Subscribe

दिवाळीत घराघरांमध्ये गोड पदार्थ बनवले जातात. तसेच भेट म्हणूनही एकमेकांना मिठाईचे वाटप केले जाते. यामुळे दिवाळीत वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाईंचा घरात ढिग लागतो. अशावेळी एवढी सगळी मिठाई संपवायची कशी असा प्रश्न पडतो. जर तुमच्याकडे सोनपापडी किंवा माव्यापासून बनवलेली मिठाई असेल तर या दोन्ही मिठायांना एकत्र करून खीर तयार करु शकता.

 

- Advertisement -

साहित्य :

 • सोनपापडी
 • माव्याची मिठाई
 • चवीनुसार साखर
 • 1 मोठा चमचा तूप
 • 1 लीटर दूध
 • 1 वाटी काजू, बदाम आणि पिस्ता

कृती : 

Kheer Recipe | Rice Kheer » Dassana's Veg Recipes

 • सर्वप्रथम एका कढईत तूप गरम करून घ्यावे. त्यात बदाम आणि पिस्ता टाकून लालसर भाजून घ्यावा.
 • नंतर त्यात दूध टाकावे. दूधात सोनपापडी, माव्याची मिठाई कुस्करून टाकावी.
 • हे मिश्रण 2-3 मिनिट ढवळून घ्यावे.
 • नंतर त्यात चवीप्रमाणे साखर टाकावी.
 • 5-10 मिनिट मंद आचेवर खीर शिजवून घ्यावी नंतर थंड झाल्यावर सर्व्ह करा.

 

- Advertisement -

हेही वाचा :

Recipe : खवा नाही तर बनवा बिस्कीटापासून गुलाबजाम

- Advertisment -

Manini