घरमहाराष्ट्रST Bus : दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई; एका दिवसात 75 वर्षांच्या इतिहासातील...

ST Bus : दिवाळीत एसटीची विक्रमी कमाई; एका दिवसात 75 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक उत्पन्न

Subscribe

मुंबई : राज्‍य सरकारने महिलांना तिकीट दरात 50 टक्के सवलत दिल्‍यामुळे एसटी प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नातही भर पडताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या दिवाळीत एसटी महामंडळाने विक्रमी कमाई केली आहे. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्नाची नोंद झाली आहे. एका दिवसात राज्यात एसटीने 37 कोटी 63  लाख रुपयांची कमाई झाली. एसटीच्या 75 वर्षांच्या इतिहासातील एक दिवसात मिळवलेल्या उत्पन्नापैकी हे सर्वाधिक उत्पन्न आहे. विशेष म्हणजे गर्दीचे आणि  उत्पन्नाचे अनेक विक्रमही एसटीने मोडले आहेत. (ST Bus Record revenue of ST in Diwali Highest income in one day in 75 years history)

हेही वाचा – Jalna Dhangar Reservation Protest : दगडफेक प्रकरणी 15 जण ताब्यात; 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

- Advertisement -

यंदाच्या दिवाळीत 8 ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्य सरकारने एसटी प्रवासावर 10 टक्के भाडेवाढीचा निर्णय होता. मात्र त्यानंतरही प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर एसटीला पसंती दिली. त्यामुळे 1 ते 20 नोव्हेंबर दरम्यान एसटीला तब्बल 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळले. तर ऐन दिवाळीत म्हणजे 8 ते 20 नोव्हेंबर दरम्यान तब्बल 390 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी एसटीच्या इतिहासातील विक्रमी उत्पन्न मिळले असून एसटीने तब्बल 37 कोटी 63 लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत एसटी महामंडळाचे उत्पन्न जवळपास 800 कोटींपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात एसटी नफ्यात असणार आहे.

भाऊबीजेला 95 कोटी रुपयांचे उत्पन्न

भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर म्हणजेच 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान एसटीने 95 कोटी 35 लाख रुपयांचं उत्पन्न कमावले आहे. यात रायगड जिल्ह्यातील महाड आगाराने भाऊबीजेच्या दिवशी उत्पन्नात बाजी मारली आहे. महाड आगार हे मुंबई व महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथून मुंबई, ठाणे, कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात एसटीची वाहतूक होते. भाऊबीजेच्या दिवशी महाड आगारातून एसटीचे 22 हजार 802 किलोमीटर मार्गक्रमण झाले. 14 ते 16 नोव्हेंबर दरम्यान जवळपास 4 हजार 187 महिलांनी प्रवास केला. निव्वळ एका दिवसाचे महाड आगाराचे उत्पन्न 9 लाख 42 हजार 569 रुपये इतके झाले असून त्यापैकी महिला प्रवाशांचे उत्पन्न 1 लाख 73 हजार 930 रुपये इतके आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Kartiki Ekadashi : पंढरपूरमध्ये ‘इतक्या’ अटींसह मराठा समाजाचे आंदोलन मागे; फडणवीस करणार महापूजा

नुकसान भरून काढण्यास मदत

ग्रामीण भागात आजही एसटी हा एकमेव पर्याय आहे. परंतु राज्यात कोणतीही घडामोड घडली तर त्याचा थेट परिणाम हा एसटीवर होतो. नुकतेच मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे एसटीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्यामुळे एसटी सेवा ठप्प झाली होती. परंतु दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. त्यामुळे यंदाची दिवाळी ही एसटी महामंडळासाठी खास ठरली असून नुकसान भरून काढण्यास मदत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -