घरमहाराष्ट्रRaj Thackeray : राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, म्हणाले - हे...

Raj Thackeray : राहुल शेवाळेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, म्हणाले – हे माझे भाग्य…

Subscribe

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमिवर शेवाळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यातून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरेंनी कोणत्याही अटीशर्थींशिवाय राज्यात महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचनिमित्ताने आज शुक्रवारी (ता. 19 एप्रिल) मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. साधारणतः 18 वर्षानंतर राज ठाकरे धनुष्यबाण चिन्हाला मत देणार आहेत, हे माझे भाग्य असल्याचे म्हणत शेवाळेंनी आनंद व्यक्त केला. (Raj Thackeray Meet Mahayuti candidate rahul shewale)

मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमिवर शेवाळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आमदार सदा सरवणकर, मनसे नेते संदीप देशपांडे, माजी आमदार तुकाराम काते आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी राहुल शेवाळे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या भेटीमध्ये राज ठाकरेंकडून निवडणुकीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या सूचना राहुल शेवाळे यांना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : महाविकास आघाडीचा सांगलीचा तिढा मिटणार; राऊत म्हणाले, विशाल पाटील आमचे…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबतची माहिती देताना खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, सध्या तापमानाचा पारा चढता असताना प्रचारात स्वतःची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला. प्रचार करताना सोबत गार पाण्याची बाटली, आणि उन्हाचा त्रास कमी करण्यासाठी सोबत ओला रुमाल ठेवण्याचा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.

- Advertisement -

तसेच, राज ठाकरे यांनी महायुतीला दर्शवलेला पाठिंबा हाच एक प्रकारे प्रचार आहे. मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील रणनीती ठरवली जात आहे. समन्वयक असलेल्या संदीप देशपांडे यांच्याशी दक्षिण मध्य मतदारसंघासाठी प्रचाराचे स्वरुप, रुपरेषा काय असेल, याबाबतही चर्चा केली जाणार आहे, अशी माहितीही राहुल शेवाळे यांच्याकडून देण्यात आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट प्रेरणादायी आहे. मनसेच्या स्थापनेनंतर जवळपास 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे पहिल्यांदाच धनुष्यबाण चिन्हाला आपले मत देतील, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच 17 मे च्या महायुतीच्या सभेत राज सर्वांना मार्गदर्शन करून महायुतीच्या उमेदवारांना आशीर्वाद देतील, असेही महायुतीचे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : मंत्री ते होते आणि हिशोब मला विचारतात, शहांच्या प्रश्नाला शरद पवारांचा टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -