Tuesday, April 30, 2024
घरमानिनीHealthCold Water Shower : थंड पाण्याने आंघोळ का करावी?

Cold Water Shower : थंड पाण्याने आंघोळ का करावी?

Subscribe

अंघोळ गरम पाण्याने करावी की, थंड पाण्याने असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. पण, तुमच्या शरीराला जे सूट होते, त्याप्रमाणे आंघोळ केली पाहिजे. जास्त गरम किंवा जास्त थंड पाण्याने आंघोळ करू नये. साधे पाणी आणि कोमटपणी दोन्ही शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र, गरम पाण्याने आंघोळ करण्यापेक्षा थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे जास्त आहेत.

 केस चमकतात त्वचा सॉफ्ट होते

थंड पाण्यामुळे तुमच्या त्वचेवरील छिद्र घट्ट होतात. तसचं थंड पाण्याने केस धुतल्यास त्यातील नैसर्गिक तेल टिकून राहण्यास मदत होते आणि केस चमकदार दिसतात. तसचं थंड पाण्याने आंघोळ करणं त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतं.

- Advertisement -

ब्लड सर्क्युलेशनवर चांगला परिणाम

जेव्हा आपण थंड पाण्याने आंघोळ करतो तेव्हा आपल्या शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त पोहोचते ज्यामुळे आपण उबदार राहू शकतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्यास रक्तवाहिन्या मजबूत राहतात आणि त्यामुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. या मार्गाने निरोगी राहण्यास मदत होते.

झोपेची गुणवत्ता वाढवते

झोपण्यापूर्वी थंड पाण्याने आंघोळ केल्याने चांगली झोप येण्यास मदत होते. थंड पाण्याने आंघोळ केल्यावर शरीराचे तापमान कमी होते. ही प्रक्रिया झोपेची चक्रे नियमित ठेवते आणि सखोल, अधिक शांत झोप घेण्यास मदत करू शकते.

- Advertisement -

वजन कमी होण्यास मदत

थंड पाण्याने आंघोळ करण्याचा आश्चर्यकारक फायदा म्हणजे वजन कमी होणे. थंड पाण्याने आंघोळ केल्याने तुमच्या कॅलरीज जलद बर्न होण्यास मदत होईल. यामुळे तुमची उर्जेची पातळी वाढते ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.

स्नायूंच्या वेदनापासून आराम

थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराची सूज आणि स्नायूदुखणे कमी होते. यामुळेच थंड पाण्याने आंघोळ करणे खेळाडूंसाठी खूप फायदेशीर मानले जाते.

या गोष्टी लक्षात ठेवा

जर रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे. कारण तुम्हाला सर्दी, खोकला, निमोनिया, घशाची जळजळ आणि ताप यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय तुम्ही हृदयविकाराचे किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर थंड पाण्याने आंघोळ करणे टाळा. कारण असे केल्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

- Advertisment -

Manini