Friday, May 3, 2024
घरमानिनीBeautyभेंडीचे फेसपॅक लावून मिळवा पिंपल्स पासून सुटका

भेंडीचे फेसपॅक लावून मिळवा पिंपल्स पासून सुटका

Subscribe

भेंडीमध्ये कॅल्शिअम,फॉस्फरस,पोटॅशिअम, व्हिटामिन्स असे अनेक घटक आहेत. भेंडी फक्त आरोग्यासाठी नाहीच तर त्वचेसाठीही फायदेशीर आहे. भेंडीची भाजी आपण खातोच पण भेंडी फेस पॅक म्हणून चेहऱ्याला लावली तर त्याचे आपल्या त्वचेला खूप फायदे होतात. तरूण वयात चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही समस्या सगळ्यांनी अनुभवली आहे. चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी वेगवेगळ्या क्रिम्स किंवा फेसपॅक आपण चेहऱ्याला लावतो. बऱ्याचदा महागडे प्रोडक्ट वापरून चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होत नाहीत. त्या्मुळे आज आम्ही तुम्हाला भेंडी फेसपॅक कसा तयार करावा हे सांगणार आहोत.

भेंडीचे फेसपॅक कसे तयार कराल?

1,800+ Bhindi Okra Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

- Advertisement -
  • भेंडीचे फेसपॅक तयार करण्यासाठी पहिल्यांदा भेंडी स्वच्छ धुवून घ्या.
  • भेंडी धुतल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
  • भेंडी मिस्करमध्ये बारिक करताना त्यात पाणी घालू नका.
  • भेंडी मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पेस्ट तयार करून घ्या.
  • हि पेस्ट 15-20 मिनीटे चेहऱ्याला लावून ठेवा.
  • फेसपॅक सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या.

चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या प्रत्येक वयातील लोकांना जाणवते. वय वाढते तसे पिंपल्स येण्याचे प्रमाणही वाढते. चेहऱ्यावरील पिंपल्स घालविण्यासाठी भेंडीचे हे फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावू शकता. आठवड्यातून 2 वेळा भेंडीचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे जर चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करायचे असतील तर भेंडीचे फेसपॅक नक्की लावून बघा.


हेही वाचा  : 

- Advertisement -

vegetable face pack : हेल्दी स्किनसाठी बनवा भाज्यांचा फेसपॅक

 

- Advertisment -

Manini