घरताज्या घडामोडी....अन् चंद्रकांत पाटलांनी चक्क चेहऱ्यावर 'फेस मास्क' लावून केलं भाषण

….अन् चंद्रकांत पाटलांनी चक्क चेहऱ्यावर ‘फेस मास्क’ लावून केलं भाषण

Subscribe

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्याप्रकरणी आंदोलने करण्यात आली. अशातच आता चंद्रकांत पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून चेहऱ्यावर फेस मास्क लावून भाषण केले.

महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरात चंद्रकांत पाटलांवर शाई फेकल्याप्रकरणी आंदोलने करण्यात आली. अशातच आता चंद्रकांत पाटील यांनी खबरदारीचा उपाय म्हणून चेहऱ्यावर फेस मास्क लावून भाषण केले. पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांनी फेस मास्क घातला होता. (pune pimpri chinchwad chandrakant patil arrived at the program wearing a face mask)

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चेहऱ्यावर फेस मास्क लावून पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमात भाषण केले. मागील आठवड्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. त्यानंतर ‘आजही पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार’, अशा आशयाची पोस्ट विकास लोले यांच्याकडून करण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा म्हणून चंद्रकांत पाटलांनी हा उपाय केल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

विकास लोले यांची पोस्ट

”आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार?* मु.पो.सांगवी , पत्रकार मित्रांनो आज पण चांगला अँगल घ्या” या अशा आशयाची पोस्ट लिहण्यात आली आहे. …तोंड काळे करा रे, असा धमकीचा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला होता.

- Advertisement -

नेमकी घटना काय?

चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. या पार्श्वभूमीवर हा शाईफेकीचा प्रकार घडला. पाटील हे चिंचवड गाव येथे मोरया देवस्थानच्या कार्यक्रमासाठी आले होते. या ठिकाणी एका व्यक्तीने त्यांच्यावर शाई फेकली.

चंद्रकांत पाटीलांचे विधान?

चंद्रकांत पाटील पैठण एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देताना आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत”, असे त्यांनी म्हटले.


हेही वाचा – Amitabh Gupta: अमिताभ गुप्तांची ९० तासात पुन्हा बदली, फडणवीसांनी भाकरी फिरवली

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -