Friday, May 3, 2024
घरमानिनीBeauty'हे' 4 DIY फेस मास्क वापरा टॅनिंग घालवा

‘हे’ 4 DIY फेस मास्क वापरा टॅनिंग घालवा

Subscribe

चेहऱ्याचे सौंदर्य कायम टिकून रहावे म्हणून फेशियल ते विविध ब्युटी प्रोडक्टस लावले जातात. या व्यतिरिक्त चेहऱ्यावर आलेले पिंपल्स किंवा सुरकुत्या दूर करण्यासाठी ही काही ब्युटी ट्रिटमेंट केले जातात. मात्र प्रत्येकवेळी केमिकलयुक्त प्रोडक्ट्सचा वापर करुन चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्याऐवजी काही घरगुती उपायांनी सुद्धा तुम्ही तुमचा फेस ग्लो करु शकता. यामुळे शरिरातील कोलेजनसह पीएच स्तर ही वाढतो. तर जाणून घेऊयात टॅनिंग घालवण्यासाठी असे कोणते आहेत 4 DIY फेस मास्क. (Face mask for tanning remove)

-ट्रिटमेंट मास्क
उन्हाळ्याच्या दिवसात आपली मान, हात, गुघडे किंवा शरिरावर अन्य ठिकाणी टॅनिंगची समस्या होते. खरंतर विदाउट स्लीव्स आणि शॉर्ट कपडे घातल्याने ही समस्या अधिक उद्भवू शकते. अशा समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही ट्रिटमेंट मास्कचा वापर करु शकता. यामुळे त्वचा उजळ होते आणि मऊ सुद्धा होते.

- Advertisement -

कसा तयार कराल?
एका वाटीत नारळाचे तेल आणि समप्रमाणात लिंबूचा रस घ्या. आता या दोन्ही गोष्टी एकत्रित मिक्स करुन त्यात अर्धा टिस्पून हळद टाका. ही पेस्ट तयार झाल्यानंतर तुमची बोटं, मान, गुडघे येथे लावा. 2-3 मिनिट ही पेस्ट ठेवल्यानंतर ओल्या कपड्याने ती पुसून काढा. आठवड्यातून दोन-तीन वेळा तुम्ही असे केल्याने तुमची त्वचा उजळ होऊ शकते.

-डी टॅन मास्क
टॅनिंगच्या समस्येमुळे सर्वजण त्रस्त असतात. सन डॅमेजमुळे उगाचच टॅनिंग वाढले जाते. बहुतांश लोक या समस्येपासून दूर राहण्यासाठी काही प्रोडक्ट्सचा वापर करतात. हातापायांवर होणाऱ्या या समस्येला दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी डी टॅन मास्क तयार करु शकता.

- Advertisement -

कसा तयार कराल?
यासाठी दोन चमचे बेसन आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या. यामध्ये दोन-तीन चमचे हलके कोमट दूध मिक्स करा. ही पेस्ट व्यवस्थितीत मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर ती जेथे टॅनिंग झाले आहे तेथे लावा. 10-15 मिनिट ही पेस्ट लावून झाल्यानंतर तुम्ही ती स्वच्छ धुवा.

-स्पॉटलेस स्किन मास्क
आज विविध प्रकारचे ब्युटी प्रोडक्ट्स मार्केट्समध्ये मिळतात. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील डाग दूर होतात. या व्यतिरिक्त हार्मोनलचा स्तर बिघडल्यानंतर पिगमेंटेशनची समस्या वाढू लागते. यापासून दूर राहण्यााठी सोप्पी पद्धत पाहा.

कसा तयार कराल?
स्पॉटलेस स्किन मास्क तयार करण्याासठी तुम्ही एक चमचा एलोवेरा जेलमध्ये पपईचा एक तुकडा मिक्स करा. आता या मिश्रणात लिंबूचा रस टाका. ही पेस्ट तयार करु झाल्यानंतर एक चमचा मध आणि तांदळाचे पीठ ही त्यात मिक्स करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावा.

-ब्लॅक हेड्स आणि व्हाइट हेड्स मास्क
नाक आणि ओठांसह टी झोनवर होणारे ब्लॅक आणि व्हाइट हेड्स चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवतात. अत्याधिक ऑयली स्किनमुळे पोर्समध्ये असलेली डस्ट ही ब्लॅक हेड्स मध्ये रुपांतरित होते. तुम्ही हे घरगुती उपायांनी दूर करु शकता.

कसा तयार कराल?
यासाठी तीन चमचे गुलाब पाणी घेऊन त्यात एक ग्रीन टी बॅग टाका, टी बॅग जवळजवळ पाच ते सात मिनिटे त्यात बुडवून ठेवा. त्यानंतर टी बॅग त्यामधून काढून घेतल्यानंतर त्यात थोडी हळदं आणि बेसन टाकून एक पेस्ट तयार करा. ही तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकेपर्यंत ती राहू द्या. असे केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅक आणि व्हाइट हेड्स निघून जातील.


हेही वाचा- तुमच्या फूड्समध्ये ‘या’ न्युट्रिएंट्सच्या कमतरेमुळे Dark circle ची समस्या उद्भवेल

- Advertisment -

Manini