Thursday, April 18, 2024
घरमानिनीHealthआठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने राहाल हेल्दी

आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने राहाल हेल्दी

Subscribe

आजकाल अनेकजण लठ्ठपणाने त्रस्त आहेत. अनियमीत आहार, अपूर्ण झोप आणि व्यायाम करण्याचा आळस यांमुळे लठ्ठपणा निर्माण होऊ लागला आहे. अशावेळी जर तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास करण्यास सुरूवात केली. तर त्याचा तुम्हाला नक्की चांगला परिणाम पाहायला मिळेल

उपवास करण्याचे फायदे

30 Healthiest Fruits and Their Benefits, According to Experts

- Advertisement -
  • आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने आठवडाभर खाल्लेले चुकीचे पदार्थ आपल्या शरीरात चरबी जमा करतात, ज्यामुळे वजन वाढते. जर तुम्ही आठवड्यातून एक दिवस उपवास केला तर काही दिवसात तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. यामुळे तुमचे वजन कमी होत नसेल तर कमीत कमी वाढत नाही.
  • उपवासामुळे आपली पचनक्रिया सुरळीत होते, उपवासाच्या काळात आपले शरीर स्वतःला Heal करते, ज्यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत होते. तसेच उपवासादरम्यान गॅस, जळजळ आणि कफ यांसारखे त्रास ही आपल्याला होत नाहीत.
  • आठवड्यातून एकदा उपवास करत राहिल्याने शरीरातील साठलेले कोलेस्ट्रॉल कमी होते, कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने शरीरातील हृदय रोगाचा धोका कमी होऊ लागतो.

4 basic rules of eating fruits | HealthShots

  • उपवासामुळे शरीरातील इम्युनिटी मजबूत होते, तसेच उपवासात आपण जास्त जेवण करत नाही. त्यामुळे आपले वजन कमी व्हायला मदत होते. शिवाय उपवासामुळे शरीर चपळ होते.
  • उपवासामुळे ब्रेन डिराईव्ह न्युरोट्रोफिक फॅक्टर नावाचे प्रोटिन निर्माण होते. या प्रोटिनमुळे तुमच्या मेंदुची गती वाढण्यासाठी मदत होते.
  • बाहेरचे फास्ट फूड खाल्ल्याने आपल्या पचनक्रियेला त्रास होऊ लागतो. उपवास केल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीर बरे होऊ लागते. एक दिवस उपवास केल्याने पोटाशी संबंधित सर्व समस्यांपासून आराम मिळतो.

हेही वाचा :

वजन वाढवायचंय? मग फॉलो करा ‘हा’ डाएट प्लॅन

- Advertisment -

Manini