Sunday, April 28, 2024
घरमानिनीHealthवॉटर फास्टिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

वॉटर फास्टिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Subscribe

वाढत्या लठ्ठपणामुळे डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर आणि हार्टशी संबंधित अनेक समस्या उदभवतात. हे टाळण्यासाठी बरेच जण जिम, योगा असे व्यायाम करतात. बरेच जण तर उपवासाद्वारे वजन कमी करण्याचा प्रयन्त करतात. यापैकी वजन कमी करण्याची एक पद्धत सध्या ट्रेंडिंगवर आहे ते वॉटर फास्टिंग. अलीकडच्या काळात वॉटर फास्टिंग हा एक ट्रेंड बनला आहे.

वॉटर फास्टिंग म्हणजे काय?

- Advertisement -

वॉटर फास्टिंग डाएटमध्ये व्यक्ती काहीही खात नाही केवळ या उपवासात तो पाणी पितो. साधारपणे, एखादी व्यक्ती 24 ते 72 तास फक्त पाणी पीत असतो. या फास्टिंगचे अनेक फायदे संशोधनातून दिसून आले आहेत. असे मानले जाते की, वॉटर फास्टिंग केल्याने कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेम आणि डायबिटीस यासारख्या आजारांचा धोका कमी होतो.

वॉटर फास्टिंगने वजन कमी कसे होते?

- Advertisement -

वॉटर फास्टिंग करायला कठीण असले तरी त्याचे उत्तम रिझल्ट मिळू शकतात. वास्तविक, या उपवासात तुम्ही कोणत्याही प्रकारचे अन्न न खाल्यास शरीरातील कार्बोहायड्रंट्सचे प्रमाण नगण्य राहते. शरीर ऊर्जा साठविण्यासाठी गोठवलेलेया चरबीचा वापर करते. ज्यामुळे चरबी पूर्णपणे कमी होते.

वॉटर फास्टिंगचे फायदे –

उत्तम मेटॅबॉलिझम – वॉटर फास्टिंग शरीरातील मेटॅबॉलिझम रिसेट करण्यास मदत करते. यामुळे त्याची कार्यक्षमता सुधारते.

इन्सुलिन सेन्सेटीव्हिटी – वॉटर फास्टिंग इन्सुलिन सेन्सिटिव्हि देखील सुधारते. ज्यामुळे रक्तातील साखर सुधारण्यास मदत होते.

सेल्स दुरुस्तीसाठी उपयोगी – वॉटर फास्टिंग केल्याने शरीर निरुपयोगी सेल्स काढून टाकते, ज्यामुळे आरोग्य सुधारते.

वॉटर फास्टिंगचे तोटे –

पोषक तत्वांचा अभाव – वॉटर फास्टिंगमध्ये जास्त वेळ उपाशी राहिल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण होते.

इलेक्ट्रोलाईट असंतुलन – वॉटर फास्टिंग करताना व्यक्तीला अशक्तपण, चक्कर येणे किंवा हृदयाचे ठोके वाढण्याची समस्या येऊ शक्ते.

आर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन – वॉटर फास्टिंग करणाऱ्या व्यक्तींना आर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनचा धोका असतो. यामध्ये रक्तदाब खूप कमी होतो.

यासोबतच वॉटर फास्टिंगमुळे मळमळ, डोकेदुखी, बध्दकोष्ठता, चक्कर येणे, आणि ब्लड प्रेशर कमी होणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

 

 

 


हेही वाचा : Health Care : कॅन्सरपासून दूर ठेवतील ‘हे’ पदार्थ

 

- Advertisment -

Manini