Tuesday, May 7, 2024
घरमानिनीHealthरात्रीच्या वेळी फळ खावीत का?...वाचा

रात्रीच्या वेळी फळ खावीत का?…वाचा

Subscribe

शरिराला पूर्णपणे हेल्दी ठेवण्यासाठी तज्ञ नेहमीच एक्सरसाइज करण्यासह हेल्दी डाएट खाण्याचा सल्ला देतात. केवळ भोजनच नव्हे तर गरजेचे पोषक तत्वांचा सुद्धा आपल्या खाण्यापिण्यात समावेश करावा. मात्र फळं कोणत्या वेळी खावीत याबद्दल नेहमीच प्रश्न पडला जातो. काही लोक असे मानतात की, रात्रीच्या वेळी फळं खाऊ नयेत. याच बद्दल एक्सपर्ट्स काय म्हणतात हे पाहूयात.

शरिराला फळं का गरजेची?
तुम्ही ही म्हणं ऐकली असेल की, “An apple a day keeps the doctor away” म्हणजेच प्रत्येक दिवशी सफरचंदाचे सेवन केल्याने डॉक्टरकडे जाण्यापासून दूर राहू शकता. खरंतर फळांमध्ये विविध प्रकारचे पोषक तत्त्व असतात. जसे की, पोटॅशिअम, फाइबर, व्हिटमिन सी असे काही आपल्या फायदेशीर असतात.

- Advertisement -

फळं खाण्याची योग्य वेळ काय?
फळं खाण्यासाठी काही विविध विचारधारणा आहेत. कोणत्यावेळी कोणते फळं खावे. मात्र बहुतांश लोक असे मानतात की, रात्रीच्या वेळी फळं अजिबात खाऊ नयेत. मात्र एक्सपर्ट्स असे मानतात फळांचे सेवन केल्याने कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी फळं खाण्यासाठी घाबरू नये.

कोणत्या वेळी फळं खाऊ नयेत?
एक्सपर्ट्स असे म्हणतात की, कोणत्याही वेळी फळं खाणे फायदेशीर असते. मात्र झोपण्यापूर्वी कमीत कमी 3 तासांआधी काहीच खाऊ नये. जेणेकरुन तुम्हाला उत्तम झोप घेता येईल.

- Advertisement -

तज्ञ असे म्हणतात की, फळं आपल्या शरीराला अनेकांना पोषक तत्त्व देतात. यामुळे आपण शरीराच्या हिशोबाने फळांचे सेवन करावे. मौसमी फळांचा स्वाद ही घ्यावा. जसे की, उन्हाळ्यात डॉक्टर अशी फळं खाण्याचा सल्ला देता ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असेल.


हेही वाचा- ‘या’ फळांपेक्षा त्यांच्या सालींमध्ये असते जास्त जीवनसत्व

- Advertisment -

Manini